Grapes : निर्यातक्षम द्राक्षाच्या (Exportable Grapes) दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी (Farmers) अडचणीत सापडले आहेत. सध्या सांगली (Sangli) जिल्ह्यात द्राक्ष निर्यातीस गती आली आहे. मात्र, निर्यातक्षम द्राक्षाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. नाशवंत माल असल्यानं द्राक्ष व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दरात द्राक्ष खरेदी करत आहेत. सध्या किलोलो 25 ते 30 रुपये इतका कमी दर मिळत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठे अंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला 60 ते 70 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. दरात पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या द्राक्षाचे बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मार्च महिन्यात तरी दरात वाढ होईल. अशी आशा द्राक्ष उत्पादकांना आहे. मात्र अद्याप दरात वाढ झाली नसल्यानं शेतकरी निराश दिसत आहेत. मागील दोन वर्षे कोरोना संकटाचा द्राक्ष बागायतदारांना मोठा फटका बसला होता. अशातच यंदा दरात मोठी घसरण झाली आहे. सद्य:स्थितीत स्थानिक बाजारपेठा अंतर्गत चांगल्या द्राक्षाला 25 ते 30 रुपयांपर्यंत किलोला भाव मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठे अंतर्गत निर्यातक्षम द्राक्षाला 60 ते 70 रुपयांपर्यंत इतकाच भाव मिळत आहे. त्यापासून मिळणारं उत्पन्न हे खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नसल्याची स्थिती आहे.
25 ते 30 रुपये किलोप्रमाणे द्राक्षाची विक्री
गेल्या 25 वर्षापासून माझी द्राक्षाची बाग आहे. सध्या माझ्याकडे अडीच एकर द्राक्षाची बाग असून, तीन वर्षापासून दरात घसरण होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक शेतकरी धनाजी हसबे यांनी दिली. द्राक्षाला योग्य दर नाही, व्यापारी नाहीत. मिळेल त्या दरात द्राक्ष विकली जात आहे. द्राक्ष विकल्याशिवाय पर्याय नाही.
पाच वर्षापूर्वी 70 ते 80 रुपये किलोप्रमाणं द्राक्ष विकली जात होती. सध्या मात्र, 25 ते 30 रुपये किलोप्रमाणे द्राक्षाची विक्री केली जात असल्याची माहिती धनाजी हसबे यांनी दिली.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही
किलोला मिळत असलेला 25 ते 30 रुपयांच्या दरानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. रोजगार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, औषधांचा खर्च वाढला आहे. त्यामानानं दरात वाढ झाली नसल्याची माहिती शेतकरी हसबे यांनी दिली. त्यामुळं पुढच्या काळात द्राक्ष बागा राहतील की नाही हे सांगता येत नसल्याचे शेतकरी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: