Maharashtra Budget Session : आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) दुसरा आठवडा सुरु होत आहे. सोमवार आणि मंगळवार अधिवेशनाचे कामकाज बंद होते. आजही विविध मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा  (rain) शेती पिकांना बसलेला फटका, शेतमालाला हमी भाव यासह इतर मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याची विरोधकांची मागणी 


राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत केली पाहिजे यासाठी विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे. सकाळी पायऱ्यांवर देखील विरोधक घोषणाबाजी करण्याची शक्यता आहे. कांदा, कोथिंबीर, मेथी, कापूस, सोयाबीन या  शेतमालाला भाव नाही. अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कमी दरानं खरेदी केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधक करतायेत. 


महाराष्ट्राचे आर्थिक धोरण जाहीर केलं जाणार


दरम्यान, आज महाराष्ट्राचे आर्थिक धोरण सभागृहामध्ये जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळं राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे यावरुन स्पष्ट होईल. राज्याच्या अर्थसंकल्प उद्या (9 मार्च) सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  



वित्त आणि नियोजन मंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. आगामी महापलिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, नागपूर या शहरांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कृषी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, सिंचन, ऊर्जा आदी विभागांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. 



महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget Session : मंत्रिमंडळ विस्तार रखडला, अधिवेशनादरम्यान मंत्र्यांना सांभाळावं लागणार अतिरिक्त विभागाचं कामकाज