CM Uddhav Thackeray : शेतकऱ्यांची मेहनत रकमेमध्ये मोजता येणार नाही. त्यांच्या श्रमाचे मोल झाले पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आपल्या कृषीप्रधान देशातल्या आणि राज्यातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ कधीच आली न पाहिजे. तो कधीच कर्जाच्या डोंगराखाली चिरडला जाता कामा नये. जो संपूर्ण देशाला जगवतो, त्याच जगणं सुसह्य करणे हेच आमच्या सरकारचे काम असल्याचे ठाकरे म्हणाले.    


ज्या शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला खरतर त्यांनीच आज आम्हाला सन्मान दिला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, जसा एखादा उद्योग चालतो, त्याप्रमाणे थोडा रिसर्च करुन, उद्या मार्केट कशाला आहे. देशात कोणत्या पिकाला मागणी येणार आहे. ते हेरुन शेतकऱ्यांना संघटीत करुन सांगणे गरजेचे आहे. उद्या कोणत्या पिकाला मागणी येणार हे ओळखून पीकं लावली पाहिजे असे ते म्हणाले. देशात समृद्धी आणणारा महामार्ग ते शेताला जोडणारे रस्ते आपण तयार करतो आहे. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे सरकारचा बहुमान असल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री मेहनत घेत आहेत. विकेल ते पिकेल ही योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव नव्हे तर हमखास भाव मिळाला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.


कृषी, क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज नाशिकमध्ये सन्मान झाला. नाशिकमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.


अन्न दाता सुखी असेल तर देशही सुखी राहतो. आपल्या कृषीप्रधान देशाचे सर्व शेतकरी हे वैभव आहेत. शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल करणारे सरकार आहे, ही भावना निर्माण झाली पाहिजे असे देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. आणखी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो नाही. मात्र, आता राज्याचे अर्थचक्र गती घेत असल्याचे ठाकरे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: