मुंबई : शिवाजी पार्कवर झालेली इंडिया आघाडीची (India Alliance) सभा ही फ्लाॅप शो होता. त्यामुळे इतर राज्यातून तडीपार झालेली लोक एकत्र आली होती. त्यामुळे उबाठाच्या गटाने माफी मागितले पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde on Uddhav Thackeray) यांनी केली. राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान केल्याची टीका त्यांनी केली. राज्यात महायुती 45 चा पार करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  


50 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं.


सीएम शिंदे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा आहे का? एकमेकांकडे निराशाने पाहत होते. ते पुढे म्हणाले की, इतर राज्यातून तडीपार झालेली एकत्र आली होती. मग मोदीजींना ही लोक कसे तडीपार करतील? गेल्या 50 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं. अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न आहे. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जात आहे. 


चौकीदार चोर आहेत म्हणाले, पण लोकांनी जागा दाखवून दिली


हा विश्वास गमावलेला पक्ष असून सर्व गमावलेले सगळे एकत्र आले आहेत. फक्त त्यांच्यामध्ये व्यक्तीद्वेष दिसून आला. मोदीजी एका उंचीवर घेऊन गेले आहेत. चौकीदार चोर आहेत म्हणाले, पण लोकांनी त्यांना जागा दाखवून दिली. यांच्याकडे पंतप्रधान पण चेहरा नसल्याने सातत्याने एकमेकांना पाहत असतात अशी टीका त्यांनी केली. शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या ठाण्यामधील रोडशोवरून खोचक टोमणा मारला. ठाण्यामध्ये पाचशे लोक सुद्धा नव्हते, मुंब्य्रात, तर पाच लोक सुद्धा नव्हते अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या सभेतील भाषणाच्या कालावधीवरही शिंदे यांनी टीका केली. पाच मिनिटे भाषणासाठी देण्यात आली यावरून त्यांची पत दिसून आली, असा टोला शिंदे यांनी लगावला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या