Ujani Dam Accident : उजनी धरण (Ujani Dam) जलाशयात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धरणात बोट बुडून सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर सोलापूर (Solapur) जिल्हा हादरुन गेला आहे. दरम्यान, या घटनेत एका संपूर्ण कुटुंबालाच जलसमाधी मिळाली आहे. करमाळा तालुक्यातील झरे गातवातील कुटुंबाचा या घटनेत मृत्यू झालाय. पती पत्नीसह दोन चिमुरड्याचा या घटनेत अंत झालाय. दरम्यान या घटनेनंतर गावावर शोककळा पसरलीय. या घटनेनंतर अख्ख्या झरे (Zare) गावात चूल पेटली नाही. या घटनेनंतर सर्वांनाच आक्रोश आणि हुंदका दाटून आलाय.


बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू


बोट दुर्घटनेची माहिती मिळतात झरे गाव आणि परिसरावर शोककळा पसरलीय. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी झरे गावातील एकाच कुटुंबातील मृतांची नावे आहेत. या घटनेतून पोलीस अधिकारी राहुल डोंगरे हे वाचले आहेत. ते पोहत किनारी आल्यामुळं त्यांचा जीव वाचला आहे. तसेच अनुराग अवघडे व गौरव धनंजय डोंगरे रा. कुगाव या सर्वांचा दुर्दैवी अंत झाला आहे.


गोकुळ यांच्या जाण्यानं घरातील कर्ता पुरुष हरपला


दरम्यान, या बोट दुर्घटनेबाबत एबीपी माझाने झरे गावातील काही ग्रामस्थांनी संवाद साधला. यावेळी ग्रमास्थांनी गोकूळ जाधव यांच्याबाबतची, तसेच या घटनेबाबतची माहिती दिली. मृत गोकूळ जाधव यांचे कुटुंब अगदी गरीब होते. प्लंबिगचा काम करुन तो कुटुंब चावलत होता. गोकूळला एका भाऊ आहे, पण तो नोकरीनिमित्त बाहेर असतो. आई वडील वयस्कर झाले आहेत. त्यामुळं गोकुळ हाच घरातील कर्ता पुरुष होता. आता गोकूळच्या जाण्यानं कुटुंबाटं फार मोठं नुकसान झाल्याचे माहिती गावातील ग्रामस्थ नाना घाटगे यांनी दिली आहे.  


दोन दिवसापासून गावात चुल पेटली नाही


या दुर्घटनेमुळं संपूर्ण झरे गाव हैराण झालं आहे. गेल्या दोन दिवसापासून गावात चुल पेटली नाही. सर्व ग्रामस्थ उपाशी असल्याची माहिती नाना घाटगे यांनी दिली आहे. असा दुर्दैवी प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये असे घाटगे म्हणाले. दरम्यान, गोकूळ आणि त्यांच्या पत्नीलाही पोहता येत होते. मात्र, वाऱ्यामुळं पाण्याचा भोवरा झाल्याची शक्यता असेल. त्यामुळेचं त्यांना पोहून बाहेर निघता आले नसल्याची माहिती नाना घाटगे यांनी दिली. 


पुलाची मागणी केली, मात्र, प्रशासनाचं दुर्लक्ष 


दरम्यान, आम्ही वेळोवेळी या नदीवरुन पलीकडे जाण्यासाठी पुलाची मागणी करत आहोत. मात्र, प्रशासन सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. दुर्घटना घडलेल्या बोटीत जर सर्व खबदारी घेण्यासाठीचे साहित्य असते तर कदाचीत हा दुर्दैवी प्रकार घडला नसता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.  


महत्वाच्या बातम्या:


आक्रोश आणि हुंदका, मृतदेह गावात पोहोचताच झरे गावातील परिसर हादरला, बेकायदा जलवाहतूक बंद करण्याची मागणी