बीड: बीडच्या माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता असलेले राजेश सलगर यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू आहे. अशातच त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता 11 लाख रुपये रोख स्वरूपात आढळून आलेत. तर 30 ग्रॅम सोने (Gold), 3 किलो 400 ग्रॅम चांदी असा लाखोंचा मुद्देमाल कारवाईत जप्त करण्यात आला आहे. गाळ उपसा परवानगी देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून (Farmer) 28 हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना एसीबीने राजेश सलगर यांना रंगेहात पकडले होते. याच अनुषंगाने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.


राजेश सलगर हे परळीतील गजानन इमारतीमध्ये राहतात. एसीबीच्या पथकाने गुरुवारी सकाळी त्यांच्या घरावर छापा टाकला. पंचासमक्ष त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली. उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, अंमलदार सुरेश सांगळे, सुदर्शन निकाळजे , स्नेहलकुमार कोरडे आणि गणेश मेहेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर एसीबीचा छापा


काही दिवसांपूर्वी एसीबीच्या पथकाने बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर छापा टाकला होता. या झाडाझडतीमध्ये  खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड (Cash) त्यासोबत 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदी (Silver) जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली होती.


आणखी वाचा


चप्पल, बूट विकणाऱ्याकडे पैशांचं घबाड, प्राप्तिकर विभागाने जप्त केली तब्बल 40 कोटींची रोकड!