Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील अवैध बंदूक परवाना विरोध व्हिडिओ आणि फोटो समोर आणत आवाज उठवल्यानंतर आता आपण पुन्हा एक नवीन बॉम्ब टाकला आहे. दमानिया यांनी आज बीडमधील सगळ्या दारू दुकानांची बारची तसेच परमिट रुमच्या मालकांची पूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. दमानिया त्यांनी ट्विट केलं असून पत्रही शेअर केलं आहे.
काय म्हटलं आहे अंजली दमानिया यांनी?
दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बीडमधील सगळ्या दारूच्या दुकानांच्या, बार व परमिटरूम च्या मालकांची पूर्ण चौकशी व्हावी. हंसराज कमलाकर देशमुख यांच्याकडून 29//11/24 ला जी जमीन घेतली, त्या माणसाकडे दोन FLIII लाइसेंस (परमिट रूम लायसेन्स) आहे. हाॅटेल पॅराडाइज नावाने आंबेजोगाईला. हा डेटा मी एक्साइज विभागातून घेतला आहे. 1974 नंतर वाइन शॉपचे लायन्सेस देणे बंद झाले आहेत. जे नवीन बिजनेस सुरु करतात त्या जुने लाइन्सेस विकत घ्यावे लागते. काही लोक ट्रान्सफर करतात तर काही जुनेच नाव ठेवतात. माझी मागणी आहे की बीडमधील सगळ्या दारूच्या दुकानांच्या, बारच्या व परमिट रूमच्या मालकांची पूर्ण चौकशी व्हावी, सगळ्या गोष्टी बाहेर येतील. काल मी एका गोपनीय पत्राबद्दल लिहिले होते. हा पुढचा पुरावा.
दरम्यान, दमानिया यांनी आणखी एक ट्विट करताना वाल्मिक कराड एका ठिकाणी सहकाऱ्यांसमवेत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या फोटोचा आणि अंजली दमानिया यांनी मागणी केलेल्याचा काही संदर्भ आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील?
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी एसआयटी, सीआयडी चौकशी ही धूळफेक असून शासनाने थेर चालवले आहे, बीड जिल्ह्यात एसआयटी चौकशी करायला देत असाल तर काय खाक चौकशी करतील? त्यामध्ये वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं आहेत. बाहेरुन माणसं आणा, एसआयटी बरखास्त करा अशी मागणी केली होती. बीडमधील पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु असल्याचाही आरोप केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या