Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी ही धूळफेक असून शासनाने थेर चालवले आहे, बीड जिल्ह्यात एसआयटी चौकशी करायला देत असाल तर काय खाक चौकशी करतील? त्यामध्ये वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं आहेत. बाहेरुन माणसं आणा, एसआयटी बरखास्त करा ही आमची मागणी असल्याचा हल्लाबोल अंजली दमानिया यांनी केला. बीडमधील पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून मानसिक छळ सुरु असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. 700-800 काॅल झाले असून गलिच्छ भाषेत कमेंट केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या. 


तर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेल्याशिवाय राहणार नाही


मला येणारे फोन फक्त वंजारी समाजाचे नाही, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. अजितदादा गुलाबी कपडे घालून पिंक रॅली काढत होते, त्यांच्यात पक्षातील लोक धमक्या देत आहेत. उद्या वाल्मिक कराड आमदारकीसाठी उभं राहिल, समाजानं यासर्वाचा विचार करायला पाहिजे. अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तरं दिली होती, मात्र एसआयटी चार दिवस आधी स्थापन झाली आणि त्यातील लोकं देखील बीडमधीलच आहे जे चुकीचं आहे. हे सर्व बदललं गेलं पाहिजे, वेळ आली तर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वंजारी समाजानं पुढे येत लढायला हवं, डोक्यात लोकांच्या भुसा भरलेला आहे. समाजाविरोधात कधीही बोलले नाही आणि बोलणार नाही. तुकाराम मुंडेंसारखी चांगली माणसे देखील आहेत. मुख्यमंत्र्यांना मॅसेज केला होता. मात्र, त्यांच्याकडून उत्तरं आलेलं नाही. शासन आम्हाला वेडं समजतं का? हा प्रश्न आहे. सगळे एकत्रच आहेत, सगळ्यांबरोबरचे फोटो आपण पाहिले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 


अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आली


त्यांनी सांगितले की, शिक्षक भरतीसंदर्भात याचिका दाखल झाली होती. बिंदू नामावली निभावू असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, यासंदर्भात पंकजा मुंडे यांनी ट्विट करत त्याला स्थगिती दिली हे फॅक्ट आहे. मी पेपरशिवाय बोलत नाही, अख्खी फौज माझ्या मागे लावण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. 


पहिल्या दिवशी 700-800 काॅल आले


नरेंद्र सांगळे यांनी माझा नंबर फेसबुकवर टाकला, उचलत नाही तोपर्यंत काॅल करत राहा असा उल्लेख केला. बाजारु कार्यकर्ते म्हणत ट्वीट करायला लागले आहेत. सुनील फड यांनी देखील तसंच केलं. खालच्या दर्जाच्या कमेंट करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी 700-800 काॅल आले, आज चौथा दिवस आहे आणि फोन बंद झालेले नाहीत. स्कुबा डायव्हिंगचा फोटो टाकला आणि अश्लील आक्षेपार्ह बोलल्याचे त्या म्हणाल्या. सुनील फडचा धनंजय मुंडे यांच्यासोबतचा फोटोही त्यांनी दाखवला.  सगळे पंकजा आणी सुनिल फड यांचे कार्यकर्ते आहेत. संभाजी चौरे हा सुद्धा पंकजा मुंडे यांचा कार्यकर्ता असून काॅल केला आहे. मोहन आघावने काॅल केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्या सगळ्यांवर शासनानं कारवाई करावी, रश्मी शुक्ला यांना मेसेज केला होता, 7 तारखेला त्यांना भेटायला जाणार असल्याचे त्या सांगितले. किती लोकं एकाच समाजाची आहे, पोलिसात किती आहेत? शासनाचे नियम पाळले गेले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 


वंजारी समाजाचा वापर होतोय 


अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या उच्च पदांवर वंजारी समाजातील बीडमध्ये लोकं आहेत असं बोलले होते. गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून हे होत आलं आहे. बीडमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. यामध्ये कोणत्याही प्रकारे जाती समाजाविरोधात बोलले नाही ट्विटरवर स्पष्ट करण्यासाठी मी दोन मुद्दे टाकले. भगवान बाबा नेहमीच वंदनीय आणि आदरणीय आहेत. समाज कष्टाळू, आळशी आहे असं मी कुठेही म्हंटलं नाही, समाजाला हा प्रकार चुकीच्या पद्धतीनं सांगण्याचे काम केल्याचा आरोप दमानिया यांनी केला. सानप मुंडे उच्च पदावरील माणसं परळीतच का? यासंदर्भात मी बोलले आणि ते लिहीलं देखील होतं आणि दाखवलं होतं. वंजारी समाजाचा वापर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडून होतोय यात शंका नसल्याचेही त्या म्हणाल्या


इतर महत्वाच्या बातम्या