Akola News अकोला : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. दरम्यान, पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली आहे. उद्या, सोमवार 15 जुलै  पासून 19 जुलै पर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


प्रकल्प अधिकारी म्हणून आठवडाभर घेणार कामकाजचे प्रशिक्षण


सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर या पुणे इथं प्रशिक्षणार्थी काळात  वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. त्यानंतर पूजा खेडकर यांना प्रशिक्षणार्थी  म्हणून  वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर सहायक जिल्हाधिकारी म्हणून 11 जुलै रोजी रुजू झाल्या. पहिल्याच दिवशी त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी एस. बूवनेश्वरी यांची भेट घेऊन वाशिमच्या जलसंपदा विभागासह 12 जुलै रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचं प्रशिक्षण घेतले. तर इथून पुढे त्या येत्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवार 15 जुलै  पासून 19 जुलैपर्यंत अकोला येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून आठवडाभर कामकाज प्रशिक्षण घेणार आहे. त्याकरिता त्यांना अकोल्यात हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानंतर 22 जुलै पासून विविध शासकीय अधिकारी यांच्या भेटी घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. 


पूजा खेडकर यांचा 'कार'नामा


शासकीय नियमानुसार खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशा नावाची पाटी लावणे अयोग्य आहे. पण पूजा खेडकर यांच्या या आलिशान ऑडी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली होती. खेडकर या 2022 सालच्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांच्या या ऑडी कारला व्हिआयपी नंबर आहे. शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा लावण्यात आलेला आहे. हीच गाडी घेऊन पूजा खेडकर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यायच्या. त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांच्या या ऑडी कारची सगळीकडे चर्चा होती.


हे ही वाचा