मुंबई : सध्या मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाची जोरदार बँटिंग चालू आहे. आजदेखील (14 जुलै) रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच सातारा या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या चार जिल्ह्यांना रेड अर्लट दिला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये 14 जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आलाय. या दोन जिल्ह्यांत आज डोंगराळ भागात अति मुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील अन्य भागातही मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या सुषमा नायर यांच्या माहितीनुसार 11 जुलैपासून या भागात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून पुढच्या तीन दिवसांत त्याचा प्रभाव वाढणार आहे.


मुंबईत पावसाची काय स्थिती? 


ताज्या हवामान अंदाजानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.


पालघरमध्ये पावसाची उसंत, पण रेड असर्ट


पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज उसंत घेतल्याने पालघरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पालघर जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट असल्याने आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील भात शेतीतील रोपणीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येतोय. तर काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे.


पुण्यातही घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा, भागात 100 मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात 200 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे.  


हेही वाचा :


मोठी बातमी! पुणे पोलिसांनी 'ती' ऑडी कार घेतली ताब्यात, पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार?


Rain Update LIVE: मुंबई, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी, पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं वाहतूक उशिराने


Sanjay Raut : 'आपण खोट बोलायचं नाही, खोटं बोलण्याचा मक्ता नरेंद्र मोदींना दिलाय'; संजय राऊतांचा टीकेचा बाण