कोल्हापूर : हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर म्हणजे उद्या झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु, त्याआधी हर हर महादेव चित्रपटाच्या संदर्भात कोल्हापुरातील शिवभक्तांनी अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांची भेट घेऊन आक्षेपार्ह सीन वगळण्याची मागणी केलीय. यावेळी बोलताना या पुढे कोणतीही बायोपिक करणार नाही, अशी भूमिका सुबोध भावे यांनी घेतली आहे. 


उद्या झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. यावरून हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. त्यातच कोल्हापुरातील शिवभक्तांनी हर हर महादेव चित्रपटाचे उद्याच्या टीव्हीवरील शोमध्ये आक्षेपार्ह सीन वगळलेले दिसले नाहीत तर सुबोध भावे यांचे कोल्हापुरात पुढचे काही दिवस शूटिंग सुरू आहे हे विसरू नये, असा इशारा दिलाय. त्यानंतर शिवभक्तांसोबत बोलताना सुबोध भावे यांनी आपली हतबलता बोलून दाखवली आहे.  


"मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार. परंतु, पण इथून पुढे कोणतीही बायोपिक करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेल्या शेवटचा बायोपिक सिनेमा असेल, असे सुबोध भावे यांनी म्हटले आहे. दरम्यान, चित्रपटातील आक्षेपार्ह सीन वगळण्यासह शिवभक्तांच्या भावना दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती कोल्हापुरातील शिवभक्तांनी केली आहे.  


"हर हर महादेव या चित्रपटात आक्षेपार्ह सीन असल्याचा आरोप करत शिवभक्तांनी हा चित्रपच थिएटरमध्ये बंद पाडला होता. परंतु, त्यांतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहीरात झीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीराजेंसह राज्यातील शिवभक्तांनी झी स्टुडीओला चित्रपट दाखवू नये इन्यथा गंभीर परिणाण भोगावे लागतील असा इशारा दिलाय. "इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इसा इशारा संभाजीराजे यांनी दिलाय. 


दरम्यान, टीव्हीर हा चित्रपट दाखवण्याआधी तो संभाजी ब्रिगेडला दाखवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आलीय. परंतु चित्रपट न दाखवता झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर ला हरहर महादेव चित्रपट प्रसारित केला जाणार आहे. परंतु, त्यामध्ये आक्षेपार्ह भाग असल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईल आंदोलन करून झी स्टुडिओवर कार्यवाई केली जाईल असा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आलाय.  


महत्वाच्या बातम्या


हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; संभाजीराजेंचा इशारा