शिर्डी :  अभिनेता सोनू सूदने शुक्रवारी दुपारी कुटुंबीयांसह शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीला त्याने परिवारासह हजेरी लावली.


सोनू सूद शिर्डीत आल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांनी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी बाहेर येताच त्याने चाहत्यांना अभिवादन करत सॅल्युट केला. लॉकडाऊच्या काळात जे सामाजिक काम केले ते माझ्या परिवाराचं काम म्हणून केले. यामुळे माझा हा परिवार मोठा होतोय. या परिवाराचे प्रश्न सोडवण्याची ताकद मिळो अशी भावना सोनूने या वेळी व्यक्त केली.


मुंबई पालिकेच्या कारवाईबाबत बोलताना सोनू सुद म्हणाला, छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही. साईबाबांचे आशिर्वाद सदैव सोबत आहेत तेच मार्ग दाखवतील.


साई दर्शनानंतर सोनू सूद याने शिर्डीतील वृद्धाश्रमात भेट दिली. तिथल्या बेघर महिला आणी पुरूषांची सोनू सुद याने आस्थेने चौकशी केली. तर अनेक वृद्धांनी त्यांना सिनेमात पाहिलं असल्याच सांगितल्यावर सोनूही आंनदी झाला.यावेळी अनेक वृद्धांची आस्थेने चौकशी केली.


लॉकडाऊननंतर शाळा सुरू झाल्या मात्र त्याही ऑनलाईन... मात्र हा बदल होताना अनेक गरजू व गरीब विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटले गेले. मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या गरीब शंभर शालेय विद्यार्थ्यांना अभिनेता सोनूने मोबाईलचे वाटप केले.


कोपरगाव येथील आढाव माध्यमिक विद्यालयातील शंभर विद्यार्थ्यांना सोनूने प्रत्येकी दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल वाटप केले. सोनू सुद याचा कोपरगावचा मित्र विनोद राक्षे याने विद्यार्थ्यांची ही अडचण सोनूला सांगितल्यानंतर त्याने आज शिर्डीत साईदर्शनानंतर थेट कोपरगाव गाठले. मुलांना मोबाईलचे वाटप केले. त्याने दिलेल्या या भेटीने मुलंही खुप आनंदी झाली होती. विद्यार्थी आपल्या देशाचं भविष्य आहे. ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणं गरजेचं असल्याचं सोनू सूदने सांगितलं.


संबंधित बातम्या: