IIT News : आयटीआयमध्ये (IIT) आदिवासी समाजातून धर्मांतरण करून दुहेरी फायदा लाटणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे. काही विद्यार्थी अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेत होते. अशा विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढांनी (Minister Mangalprabhat Lodha) याबाबत चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीच्या अहवालात 257 विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. 


नेमके प्रकरण काय आहे? 


आयटीआयमध्ये 2023 सालच्या प्रवेश प्रक्रियेत आदिवासी समाजातून धर्मांतरण करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सखोल चौकशी करण्याचे निर्देश 2023 साली नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिले होते. प्रवेश प्रक्रियेत सवलतींच्या लाभामध्ये झालेल्या अनियमततेचा अभ्यास करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीने तयार केलेल्या अहवालानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या 13 हजार 858 विद्यार्थ्यांपैकी 257 विद्यार्थ्यांनी हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्म नोंदवलेले असल्याचे समोर आले आहे. 


समितीच्या अहवालानुसार सदर विद्यार्थ्यांवर कारवाई होणार


या समितीच्या अहवालानुसार सदर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे कौशल्य विकास विभागाने निश्चित केले असून पुढील कार्यवाहीसाठी हा अहवाल आदिवासी विकास विभागाला आज पाठवण्यात आला आहे. या समितीने आदिवासी रुढी, परंपरा, संस्कृती, चालीरीती पोशाख इत्यादी सर्वच गोष्टींचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना देखील सुचवल्या होत्या. कौशल्य विकास विभागाद्वारे सदर शिफारशी देखील आदिवासी विकास विभागास पाठवण्यात आल्या आहेत. 


आयआयटी म्हणजे इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेकनोलॉजी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था. ही एक स्वायत्त सार्वजनिक तांत्रिक आणि संशोधन विद्यापीठ आहे. मानव संसाधन विकास मंत्री हे आयआयटी परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. या संस्थेची स्थापना 15 सप्टेंबर 1956 रोजी करण्यात आली आहे. आयआयटी या भारताच्या 23 शहरात संस्था आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


IIT क्रॅक करुनही ॲडमिशनला पैसे नव्हते, लेक चारत होती बकऱ्या; थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI