जिल्हा परिषदेनं नेमलेल्या चौकशीत राहुल कलोती हे दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई होऊ शकते. अमरावतीच्या जिल्हा शिक्षण विभागानं ही माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी निवडून आल्यानंतर राहुल कलौती तीन वर्षांच्या कालावधीत फक्त 47 दिवस शाळेत गेले. अंजनगाव बारी गावातील शाळेत पहिली ते चौथी असे चार वर्ग आहेत. मात्र राहुल कलोती यांच्या गैरहजेरीमुळे एक वर्ग तीन वर्षांपासून वाऱ्यावर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मामेभावाची मनमानी, कलोती सरांची तीन वर्षांत ४७ दिवसच हजेरी
बाकीचे दिवस ते कुठे होते?, असा प्रश्न पडला असेल, तर राहुल कलोती सर शाळेत येतात तेच मुळी रजेचा अर्ज घेऊन. त्यानंतर पुन्हा गायब. आता मुख्यमंत्र्यांचेच मामेभाऊ आहेत, म्हटल्यावर कारवाई तरी कशी करणार? त्यामुळे तीन वर्ष ही सगळी मनमानी शिक्षण विभाग सहन करतो आहे.