Acharya Tushar Bhosale : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections 2024) धामधूम सर्वत्र सुरु झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या राज्यात जागावाटपावर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे राज्यभर जनसंवाद मेळाव्यातून जनतेशी संवाद साधत आहे. 


गुरुवारी उद्धव ठाकरे यांची उमरगा येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तुम्हाला सोयाबीनला 11 हजार रुपये भाव पाहिजे काय? मग 'जय श्रीराम'ची घोषणा द्या. नोकऱ्या पाहिजेत तर मग 'बजरंगबली की जय'ची घोषणा द्या, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.


 






आचार्य तुषार भोसलेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं


ओमराजे निंबाळकर यांचा व्हिडिओ ट्विट करत आचार्य तुषार भोसलेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. त्यांनी म्हटले आहे की,   जनाब उद्धव ठाकरे, तुम्ही ओवैसींचेच सैनिक ! तुमचा गट आता अधिकृतपणे ‘ओवैसी’ च्या एमआयएम पक्षात विलिन करुन टाका. कारण त्यांची आणि तुमच्या लोकांची भाषा आता एकच झाली आहे. 
तुमच्या समोर तुमचा हा खासदार हिंदुंच्या पवित्र जयजयकारांची अशी खिल्ली उडवतो आणि तुम्ही दात काढत असाल तर तुम्ही बाळासाहेबांचे नाही तर ओवैसींचेच सैनिक आहात, असे त्यांनी म्हटले आहे. आता आचार्य तुषार भोसलेंच्या टीकेवर उद्धव ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


नेमकं काय म्हणाले होते ओमराजे निंबाळकर ?


तुम्हाला सोयाबीनला 11 हजार रुपये भाव पाहिजे काय? मग 'जय श्रीराम'ची घोषणा द्या. नोकऱ्या पाहिजेत तर मग 'बजरंगबली की जय'ची घोषणा द्या. अशा घोषणा देऊन सोयाबीनचा भाव वाढणार आहे का किंवा तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत, असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला. बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्या लोकांना एका मतासाठी 50 हजार रुपये देण्यात आले. पण आपले लोक हलले नाहीत. उलट त्यांच्याकडून पैसे घेऊन आपल्या उमेदवारांना खर्च करण्यासाठी दिले, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा 


Gulabrao Patil : ठाकरेंना का सोडलं? गुलाबराव पाटील म्हणाले, मी जाणार नव्हतो शिंदे साहेबांचा फोन आला अन्...