दोन वर्गमित्र एक उपजिल्हाधिकारी, दुसरा गटविकास अधिकारी; दोघेही लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Continues below advertisement

बीड : वर्गमित्र असलेले दोन प्रशासकीय अधिकारी लाच स्वीकारताना दोन दिवसात एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Continues below advertisement

श्रीकांत गायकवाड यांना 65 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या चालकामार्फत त्यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एकदिवस आधी त्यांचे वर्गमित्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तेथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकामार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे. गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र असून आता दोघेही एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola