एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जानेवारी 2020 | मंगळवार


1. तान्हाजी सिनेमाच्या दृश्यांशी छेडछाड, शिवरायांना मोदींचा चेहरा तर तान्हाजींवर अमित शाहांचं मॉर्फिंग; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल, महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया, व्हिडीओशी संबंध नसल्याचं भाजपचं स्पष्टीकरण https://bit.ly/38vuYHN

2. वाडिया ट्रस्टमधील गैरकारभाराला राज्य सरकार आणि मुंबई महापालिकाच जबाबदार, ट्रस्टच्या कारभारावर संशय होता तर वेळीच चौकशी का नाही केली? हायकोर्टानं सुनावलं https://bit.ly/2RBQeVF

3. तत्वं बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र युती, ही तीन पायांची शर्यत महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असं वाटत नाही, भाजप नेते एकनाथ खडसेंचा आरोप https://bit.ly/38qMcWT

4. बाबासाहेबांचं स्मारक दोन वर्षात शक्य होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं, इंदू मिल येथील कामाची पाहणी केल्यानंतर शरद पवारांचं मत https://bit.ly/37edwaT

5. पाथरी-शिर्डीच्या वादात आता बीडकरांची उडी; साईबाबांनी बीडमध्ये वास्तव्य केल्याचा दावा, तीर्थस्थळ विकसित करण्यासाठी 100 कोटींची मागणी https://bit.ly/2RFDAFj

6. महाराष्ट्रातल्या 2 मुलांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार, झेन सदावर्ते आणि आकाश खिलारेची निवड, देशभरातील 10 मुलींचा आणि 12 मुलांचा पुरस्काराने सन्मान https://bit.ly/2tCuVva

7. पहिली ते सातवीसाठी सर्व विषयांचं एकच पुस्तक, दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नवा प्रयोग, पहिली ते सातवीपर्यंत सर्व विषयांचे एकच पुस्तक राहणार https://bit.ly/2TIdZ11

8. मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनल्सजवळ महिलेवर गँगरेप; रात्री अकराच्या सुमारास स्टेशनकडे जातानाची घटना, चार आरोपींना अटक https://bit.ly/2ugcWe7

9. ऑनलाईन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणारी उबर इट्स कंपनी भारतात बंद; झोमॅटोने उबरला 2500 कोटींना घेतलं विकत, व्यवसाय होत नसल्यानं विकली कंपनी https://bit.ly/3691Y7i

10. आया ये शेरों का झुंड है, मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूडपटाचा टीझर रिलीज, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत https://bit.ly/37dnZDb

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK