एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/03/2018

  1. संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर मुंबईत मोर्चा काढू, प्रकाश आंबेडकरांचं सरकारला 26 मार्चपर्यंतचं अल्टीमेटम https://goo.gl/rtAF1w


 

  1. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय https://goo.gl/ufAPLU


 

  1. कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन नाही https://goo.gl/Xq28SB


 

  1. विजया रहाटकर यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार http://abpmajha.abplive.in/


 

  1. सफाई कामगारांच्या भरती परीक्षेला यूपीएससीप्रमाणे प्रश्न, मुंबई महापालिकेच्या कारभारावर सवाल, विधानपरिषद सभापतींकडून चौकशीचे आदेश https://goo.gl/N6nzpL


 

  1. मुंबईत पवईतील विकासकाकडे 20 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांना अटक https://goo.gl/4BS1s8


 

  1. मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या छताचे प्लास्टर कोसळले, दोन रुग्ण जखमी, दुसऱ्या मजल्यावर डायलिसीस विभागातील प्रकार https://goo.gl/REKkCE


 

  1. ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना, 13 लाख नागरिकांना हक्काची घरं मिळणार, संपूर्ण शहराचाच पुनर्विकास करणारं देशातलं पहिलं शहर https://goo.gl/tWSAkr


 

  1. कचराकोंडीनंतरच्या दगडफेकीप्रकरणी औरंगाबादचे पोलिस आयुक्त सक्तीच्या रजेवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, कचराकोंडीवर विधानपरिषदेत विरोधक आक्रमक https://goo.gl/m4VwR2


 

  1. पिंपरीत तलवारीने वाढदिवसाचा केक कापला, बर्थडे बॉयसह 10 जणांवर गुन्हा https://goo.gl/P9M34b


 

  1. केंद्रात आधी भाजपला हरवायचं, नंतर नेता ठरवायचा, विरोधकांच्या एकीचा नवा फॉर्म्युला ठरला, खासदार माजिद मेमन यांची माहिती https://goo.gl/bXwqzA


 

  1. यूपी-बिहारमधील भाजपच्या पराभवानंतर शरद पवारांच्या घरी जाऊन राहुल गांधींची खलबतं! https://goo.gl/LMRGkU


 

  1. अयोध्येत राम मंदिर होणारच, तेही सर्वांच्या सहमतीने, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा दावा https://goo.gl/47TEry


 

  1. आनंदी देशांच्या यादीत फिनलंड अव्वल, पाकिस्तानसह सर्व शेजारी देश भारताच्या पुढे, भारत 133 व्या स्थानावर https://goo.gl/oPvGcX


 

  1. इराणी करंडक सामन्यातला वैयक्तिक उच्चांक विदर्भाच्या वासिम जाफरच्या नावावर; चाळीशीतल्या जाफरनं मुरली विजयचा 266 धावांचा विक्रम काढला मोडीत http://abpmajha.abplive.in/


 


*माझा विशेष* : सफाई कामगार भरतीच्या नावाखाली क्रूर चेष्टा कशासाठी?, विशेष चर्चा रात्री 9 वाजता, एबीपी माझावर

*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*