1. ठाकरे सरकारचं अखेर 15व्या दिवशी खातेवाटप, गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, कृषि या महत्वाच्या खात्यासह शिवसेनेकडे तब्बल 22 खाती, राष्ट्रवादीकडे अर्थ, ग्रामविकाससह 13 तर काँग्रेसकडे महसूल, शिक्षणासह 15 खाती https://bit.ly/2rE5hoP
 
  1. सर्वांचा असलेला भाजप पुन्हा मुठभर लोकांचा करु नका, पंकजा मुंडेंचा गोपीनाथगडावरून राज्य नेतृत्वावर हल्लाबोल, 26 जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची दिली माहिती https://bit.ly/35gZIer
 
  1. पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावरून एकनाथ खडसेंची खदखद, देवेंद्र फडणवीसांनी नेत्यांना त्रास दिल्याचा आरोप करत अपेक्षाभंग केल्याची भावना, पराभवासाठी षडयंत्र रचल्याचाही दावा https://bit.ly/349WF6t
 
  1. राग माणसावर काढा, पक्षावर नको, चंद्रकांत पाटलांकडून एकनाथ खडसे-पंकजा मुंडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तक्रारींवर तोडगा काढण्याचंही आश्वासन https://bit.ly/34hD0lc
 
  1. 80व्या जन्मदिनानिमित्त मुंबईत शरद पवारांचा भव्य सत्कार, पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, तर वाढदिवसानिमित्त 80 लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांसाठी गोळा https://bit.ly/2LMMNZY
 
  1. अयोध्या प्रकरणातील सर्वच्या सर्व 19 फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाचा निर्णय, राम मंदिराचा मार्ग मोकळा https://bit.ly/2LKXtso
 
  1. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, गेल्या अनेक वर्षांपासून ज्या लोकांवर अन्याय झाले, त्यांचं दु:ख दूर करणारं हे विधेयक, नरेंद्र मोदींची भावना https://bit.ly/34eQAGb
 
  1. पाकिस्तानातून दिल्लीत आलेलं हिंदू कुटुंब नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे आनंदी, मुलीचं नाव ठेवलं 'नागरिकता' https://bit.ly/2Ebp2GV
 
  1. जाट समाजाच्या विरोधानंतर 'पानिपत'मधील 11 मिनिटांच्या सीनवर कात्री, इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप https://bit.ly/38vuB0X 
 
  1. स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला टाइम मॅगझीनचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार, 16 वर्षांच्या ग्रेटावर कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/2E7laXs
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE*  -  https://goo.gl/enxBRK