एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 ऑगस्ट 2019 | सोमवार
एबीपी माझा वेब टीम | 05 Aug 2019 07:06 PM (IST)
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 05 ऑगस्ट 2019 | सोमवार 1. काश्मीर प्रश्नावर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक, कलम 370 रद्द, जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश, योग्य वेळी आणि परिस्थिती पाहून पुन्हा राज्याचा दर्जा मिळणार 2. काश्मीरच्या विकासात आणि शांततेत कलम 370 चा अडथळा, दहशतवादासाठीही हेच कलम कारणीभूत, राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांचं निवेदन 3. मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचं देशभरात जल्लोषात स्वागत, मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन https://bit.ly/2YKEkyj तर गिरीश महाजनांचा ढोल-ताशावर ठेका 4. 'काँग्रेस आत्महत्या करतेय' असं म्हणत काँग्रेसचे राज्यसभा व्हिप भुवनेश्वर कलिता यांचा राजीनामा, कलम 370 हटवल्याच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत समाजवादी पक्षाच्याही खासदारांचा राजीनामा 5. कलम 370 हटवण्याच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक, लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया, पीडीपी खासदाराकडून स्वत:चा कुर्ता फाडत निषेध 6. काश्मीरात हे काय सुरु आहे? कलम 370 हटवल्यानंतर टीव्ही अभिनेत्री गौहर खानची संतप्त प्रतिक्रिया, नेटीजन्स भडकले 7. भाजपचे मॅनेजमेंट परफेक्ट असल्याने ईव्हीएममधला दोष सिद्ध करता येत नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा जालन्यात आरोप 8. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांकडून विष प्राशन 9. दोन दिवस जोरदार बरसल्यानंतर आज मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, तर कल्याण-कर्जत रेल्वेसेवा अद्याप बंद, दुरुस्तीला उद्या सकाळपर्यंत वेळ लागणार 10. राज्यभरात नागपंचमीसह पहिल्या श्रावणी सोमवारचा उत्साह, शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची आलोट गर्दी यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK