एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 डिसेंबर 2019 | सोमवार

  1. दिल्लीत इंडिया गेटवर प्रियंका गांधींचं काँग्रेस नेत्यांसोबत धरणं आंदोलन, जामिय़ा मिलियातील पोलिसांच्या कारवाईचा निषेध, देश गुंडांच्या मालकीचा नाही, प्रियंका गांधींचं प्रतिपादन https://bit.ly/2qV1Auw


 

  1. नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात लखनौ, हैदराबाद आणि मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जीही रस्त्यावर, हिंसाचार दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ट्विट https://bit.ly/2tnm685


 

  1. 2017 च्या उन्नाव बलात्कारप्रकरणी निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी, 19 डिसेंबरला शिक्षा सुनावणार, दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात फैसला, दुसरी आरोपी शशी सिंह निर्दोष https://bit.ly/2PnDwd8


 

  1. जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच  निवडण्याची पद्धत ठाकरे सरकार बदलणार, तसंच भाजप सरकारनं घेतलेला महापालिकेतील 4 प्रभाग पद्धतही रद्द करण्याचा निर्णय https://bit.ly/2M0GQJ7


 

  1. सावरकरांच्या मुद्द्यावरुन अधिवेशनाची वादळी सुरुवात, सावरकरांवर बोलण्यासाठी बंदी का?, फडणवीसांचा सवाल, सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करल्याचाही आरोप https://bit.ly/38Sinjc


 

  1. शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत कुठलीही अनियमितता नाही, चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण तर चंद्रकांत पाटलांनी पैसे खाल्ल्यांचा नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/2Pr1GUk


 


7.डिझेल अभावी नाशिकमधील एसटी सेवा विस्कळीत, बाहेरगावी जाणाऱ्या बस आगारातच खोळंबून, खाजगीकरण सुरू असल्याचा कामगारांचा आरोप        https://bit.ly/2sxyWjs

  1. पुणे ते सातारा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा, अन्यथा खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा अहवाल सरकारला पाठवणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा https://bit.ly/2Pq1x3d


 

  1. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जाडेजाला रनआऊट दिल्याने विराट कोहली पंचांवर नाराज https://bit.ly/2PoPd3e


 

  1. दिल्लीच्या जामियानगर परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसेचा व्हिडीओ अक्षय कुमारकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव https://bit.ly/2POqRyV


 

यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK