एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 जानेवारी 2020 | मंगळवार

1.छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाबरोबरही होऊ शकत नाही, वादग्रस्त पुस्तकावर उदयनराजेंची टीका, तर जाणता राजावरुन पवार समर्थकांना टोला  शिवसेना हे नाव का वापरता, राजेंचं शिवसेनेवरही टीकास्त्र

2.छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबाबत तातडीनं सुनावणीसाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात, दोन आठवड्यांनंतर सुनावणी करण्यासाठी खंडपीठाकडून सहमती


3.मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत वाडिया प्रकरणावर तोडगा निघाल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा, वाडिया व्यवस्थापनाला 46 कोटी रूपये देण्याला संमती शर्मिला ठाकरे यांची माध्यमांना माहिती 

4.रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच मोठा अडथळा; गडकरींचा गंभीर आरोप  तर मराठवाड्यात ठेकेदारांना घरी बोलवण्याची प्रथाच, गडकरींच्या वक्तव्याला खासदार इम्तियाज जलील यांचा दुजोरा 

5.विधानपरिषदेसाठी धनंजय मुंडेंच्या जागी महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या संजय दौंड यांना राष्ट्रवादीकडून संधी, तर राजन तेली भाजपचे उमेदवार, यवतमाळमधून शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदींना उमेदवारी

6.मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर प्रवाशांची फसवणूक, फास्टटॅगच्या माध्यमातून डबल टोल वसूली, फास्ट टॅग स्कॅन होऊनही टोल नाक्यावर पैसे मागितले जात असल्याचा वाहनधारकांचा आरोप

7.दिल्लीतल्या निर्भयाचे मारेकरी फासावर लटकणार, दोषींच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाची मोहोर; सुधारित याचिका फेटाळली 

8.पाच वर्षात महागाईने उच्चांक गाठला, महागाईच्या दराची उसळी35 टक्क्यांवर, काँग्रेसचं मोदी सरकारवर टीकास्त्र 

9.गुगल ट्रान्सलेटरचा शेतकऱ्यांना झटका, ट्रान्सलेशनमुळे 628 शेतकऱ्यांच्या नावांमध्ये बदल, पंतप्रधान कृषी योजनेत घोळ 

10.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे सामना : भारतीय संघाचं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 256 धावांचं लक्ष्य

ब्लॉग : राजेशाही राजस्थान; पर्यटनाची पर्वणी : एबीपी माझाचे अश्विन बापट यांचा ब्लॉग