*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 सप्टेंबर 2019 | गुरुवार*
  1. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या गणरायाला निरोप, चांद्यापासून बांद्यापर्यंत वाजत-गाजत बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये विघ्नहर्त्याला निरोप https://bit.ly/2kwmqgR
 
  1. मुंबईत बाप्पांचा परतीचा प्रवास, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि गिरगावच्या राजासह ठिकठिकाणी गणरायाला निरोप, विसर्जनासाठी चौपाट्यांवर अलोट गर्दी https://bit.ly/2mbmR0h
 
  1. लातूरमध्ये यंदा गणरायाचं विसर्जन नाही तर गणेशमूर्तींचं दान, पाणी टंचाईमुळं गणेश मंडळांसह प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2lKqJ8u
 
  1. खासदार सुप्रिया सुळेंशी दादर स्टेशन परिसरात टॅक्सी चालकाचे गैरवर्तन, ट्विटरवर माहिती देत संताप, रेल्वे पोलिसांकडे तक्रार https://bit.ly/2m8lLlT
 
  1. महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या निवडणुकांचा दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा, लवकरच निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता https://bit.ly/2lMY6HA
 
  1. नितीन गडकरींच्या कायद्याला भाजपशासित राज्य सरकारांकडून खो, दिवाकर रावतेंकडूनही मोटार वाहन कायद्याबद्दल पुनर्विचार करण्याचं पत्र https://bit.ly/2meWpTL
 
  1. उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असतानाच पुण्यात शरद पवारांसोबत खलबतं, चर्चा यशस्वी झाल्याचे धनंजय मुंडेंचे संकेत https://bit.ly/2lKUmqc
 
  1. साताऱ्यात ट्रक आणि खासगी बसच्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू, 20 जखमी, सातारा-बंगळुरु महामार्गावर घटना https://bit.ly/2lK9xzZ
 
  1. कुलभूषण जाधवांच्या काऊन्सलर अॅक्सेससाठी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार, पाकिस्ताननं दुसऱ्यांदा काऊन्सलर अॅक्सेसला नकार दिल्यानं भारत आक्रमक https://bit.ly/2kwJqMI
 
  1. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, लोकेश राहुलला डच्चू तर शुभमन गिलला संधी https://bit.ly/2lK9q7x
  *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK