*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 नोव्हेंबर 2019 | सोमवार*

  1. अखेर सत्ताकोंडी फुटली, राज्यात 'महाशिवआघाडी'चं सरकार निश्चित, शिवसेनेला समर्थनाचं राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं पत्र फॅक्सद्वारे राज्यपालांकडे, 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेणार https://bit.ly/33Clvg1

  2.  शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, राऊतांवर अॅन्जीओग्राफी होणार, विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु https://bit.ly/2qMorYH

  3.  अरविंद सावंतांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा, राज्यातील सत्तासंघर्षाचा केंद्रावरही परिणाम, शिवसेना एनडीएतून बाहेर https://bit.ly/2CzMtck

  4. महायुतीतल्या मित्रपक्षांची शिवसेनेवर नाराजी, भाजपसोबत राहण्याचा निर्णय, तर महाशिवआघाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज, गृहीत न धरण्याचा इशारा https://bit.ly/33E2ZDN

  5.  मुख्यमंत्रिपद न देणं हा भाजपचा अहंकार, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला हल्लाबोल, तर राज्यपालांनी कमी वेळ दिल्याबाबतही राऊतांची नाराजी https://bit.ly/2NZQLyT

  6.  शिवसेनेसोबतच्या युतीबाबत संध्याकाळी साडेसातनंतर भूमिका स्पष्ट करू, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, तर महाशिवआघाडी सर्वधर्मसमभाव आघाडी असल्याचा टोला https://bit.ly/32CKaQj

  7. सत्ता अधांतरी, सत्तास्थापनेच्या तिढ्यामुळे प्रशासन वेठीस, मंत्रालयातील कारभार मंदावला https://bit.ly/2K9OQXr

  8.  भारत रत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास, प्रकृती बिघडल्याने ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल https://bit.ly/2Kbca72

  9.  बीडमध्ये आणि ट्रकच्या भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू आणि  तीन जखमी https://bit.ly/36TSAWH

  10. जेएनयूमध्ये फी दरवाढीविरोधात आंदोलन, पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले बोलेरो https://bit.ly/32AZr3V


 

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK