1. मराठा बांधवांनो, सरकार तुमच्यासोबतच, आंदोलनं करु नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन तर आज मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार 


2. 'कोरोनाचं चित्र भीतीदायक, नियम पाळा, लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका' मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा  तर महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जात असल्याचीही टीका 


3. आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार, नाशिकच्या बैठकीत भाजप आमदार देवयानी फरांदेंचं भाषण रोखलं तर राज्यभरात ठिककिठाणी आंदोलन 


4. कंगना रनौतकडून राज्यपालांची भेट, पालिकेच्या कारवाईसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, सेनेसोबतचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता 


5. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा, मुंबईसाठी संजय राऊतांची राज ठाकरेंना साद, तर राज लढत असताना सेना खासदार मूग गिळून गप्प, मनसे नेते संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर 


6. कोरोनाकाळात संसदेचं ऐतिहासिक अधिवेशन उद्यापासून, अनेक महत्वाच्या विधेयकांची मंजुरी अपेक्षित 


7. हल्लेखोरांचा सत्कार, माजी सैनिकाला मात्र लाथा बुक्क्यांचा मार; खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा 


8. बदली झाली अन् निरोप समारंभ शेवटचा ठरला, पोलिसाच्या अपघाती मृत्यूने बीडमध्ये हळहळ 


9. अभिनेता सोनू सूदचं स्तुत्य पाऊल, आता उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार, अर्ज करण्याचे आवाहन 


10. 22 वर्षाच्या नाओमी ओसाकानं दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनवर नाव कोरलं, बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्काला हरवलं


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR