एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जुलै 2020 | शुक्रवार

  1. भारत-चीन सीमेवरील जवानांना भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचा सरप्राईज लेह दौरा, भारतमातेसाठीचं जवानांचं योगदान अतुलनीय असल्याचं संबोधन https://bit.ly/3gmyPuN ‘विस्तारवादाचं युग संपलंय’ हे वक्तव्य https://bit.ly/3iutC5Z


 

  1. गूड न्यूज... कोरोनावरील भारतात बनलेली लस कोवाक्सिन 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता, आयसीएमआर आणि एनआयव्ही यांच्या संयुक्त प्रयत्नाला यश https://bit.ly/3eZwJAI


 

  1. उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपींसह आठ पोलीस शहीद, कानपूर जिल्ह्यातील शिवराजपूर गावात लपलेल्या वॉन्टेड हिस्ट्रीशिटर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांचा गोळीबार https://bit.ly/38p0lVK


 

  1. पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत दाखल खटल्यात 7 ऑगस्टला प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश, संगमनेर न्यायालयातील पहिल्या सुनावणीत समन्स बजावण्याची प्रक्रिया पूर्ण https://bit.ly/2ZvQxW5


 

  1. परभणीत पोलिसांचे सदरक्षणाय ऐवजी खलरक्षणाय.. पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मोहीमेत पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध उघड झाल्यामुळे चार पोलिस निलंबित तर एकावर बडतर्फीची कारवाई https://bit.ly/2NP38OJ


 

  1. भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर, एकनाथ खडसेंना कार्यकारिणीत स्थान, तर पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी https://bit.ly/3eVTTYZ


 

  1. तुकाराम मुंढे या व्यक्तीचा विरोध नाही, तर त्यांच्या वृत्तीचा विरोध, नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचं वक्तव्य https://bit.ly/31I5O8S

  2. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात आणि ठाण्यात पावसाची दमदार सुरुवात, सखल भागात पाणी साचलं, पुढील 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा https://bit.ly/2YUBp5g


 

  1. श्रीदेवी, माधुरी दीक्षितपासून आलिया भटपर्यंत अनेक अभिनेत्रींना कोरिओग्राफ करणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, श्वास घेण्यात त्रास होत असल्याने 20 जूनपासून सुरु होते उपचार https://bit.ly/3f9edGt


 

  1. जबरदस्त...! इतिहासात पहिल्यांदाच धावली तब्बल 8 किलोमीटर लांबीची 251 डब्यांची 'शेषनाग' मालवाहू ट्रेन, परमलकसा ते दुर्ग दरम्यानचं 22 किमीचं अंतर 22 मिनिटांत पार, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा उपक्रम https://bit.ly/31Fhp8B


 

*BLOG -*  सामना : कोरोना विरुद्ध पावसाळी आजार, संतोष आंधळे यांचा कोरोनाविशेष ब्लॉग https://bit.ly/3iuNtlx

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक -* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE -* https://goo.gl/enxBR