1. संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ, कोरोनामुळे चंद्रभागेचे सर्व घाट सील, स्नानाला बंदी


2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहाटे शासकीय महापूजा करणार, आदित्य आणि रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला रवाना


3. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केलं जाहीर, लॉकडाऊनमधील गांभीर्य अनलॉकमध्ये हरवल्याची खंत 


4. वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल वाढलं, थकीत वीजबिल तीन महिन्यांच्या टप्प्यात भरण्याची मुभा; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती


5. भारतातील पहिली कोविड-19 लस 'Covaxin'च्या मानवी चाचणीला परवानगी; जुलैपासून ट्रायल सुरु, भारत बायोटेक, इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) याच्या संयुक्त संशोधनाला मोठं यश 


6. पतंजलीचा यू-टर्न! गाजावाजा करत कोरोना बरा करणारं औषध लाँच केल्यानंतर पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचं घुमजाव, कोरोनावर उपचारासाठी औषध बनवलं नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवल्याचं स्पष्टीकरण 


7. मुंबईमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला? पाकिस्तानमधून मुंबईतील ताज हॉटेल उडवण्याची धमकी देणारा फोन, कराची स्टॉक एक्स्चेंजसारखाच हल्ला करणार असल्याचा फोनवरुन इशारा, हॉटेल ताजच्या सुरक्षेत वाढ 


8. अभिनेता आमीर खानच्या घरात कोरोनाचा शिरकाव; आमीरच्या टीममधील सात जण कोविड पॉझिटिव्ह, मुंबई महापालिकेने योग्य काळजी घेतल्याने स्वतः पत्रक काढून मानले आभार, आमीर खानच्या कुटुंबीयांच्या टेस्ट निगेटिव्ह 


9. नवी मुंबई महापालिका प्रशासनाला मोठं यश, नवी मुंबईतील सर्वात मोठ्या तुर्भे झोपडपट्टीत गेल्या 15 दिवसापासून कोरोनाचा एकही रूग्ण आढळला नाही 


10. भारत सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन TikTok अॅप हटवलं! सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अॅपवर सरकारची बंदी 


वारी स्पेशल : आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज लाखो वैष्णवजन पंढरपूरमध्ये दाखल झाले असते!


BLOG : 'डिजिटल डिस्टन्स', विनीत वैद्य यांचा ब्लॉग


BLOG | अमेरिका - चीन : 21 व्या शतकातील नवे शीतयुद्ध, संकेत जोशी यांचा ब्लॉग 


BLOG | का लागते 'टाळेबंदी'?, संतोष आंधळे यांचा ब्लॉग


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR