एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2020 | मंगळवार

1. राज्यात आता फक्त रेड आणि नॉन रेड झोन असणार, 22 मे पासून राज्यात नवी नियमावली लागू तर बिगर रेड झोनमधील सलून सुरू करण्यास परवानगी 

2.कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवारांच्या सूचना 

3. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसवर सकाळच्या सुमारास तुफान गर्दी, घरी जाण्यासाठी परप्रांतियाची धडपड तर सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा 

4. यवतमाळ आणि नांदेडमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना अपघात, दोन्ही अपघातात 6 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक मजूर जखमी 

5. केंद्राप्रमाणं राज्य सरकारनं पॅकेज जाहीर करावं, भाजप नेत्यांकडून राज्यपालांची भेट तर कोरोनासंदर्भात महाविकासआघाडीची आढावा बैठक 

6. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखावर, तीन दिवसात 15 हजार रुग्ण तर राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 35 हजार पार

7. यूट्यूबर विरुद्ध टिकटॉकर वादाचा फटका टिकटॉकच्या रेटिंगला, टिकटॉकचं रेटिंग 2.0 वर

8.मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रशासनाच्या कारभारावर सवाल

9. कोरोनावरील लसीची प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा 

10. जम्मू-काश्मीरमधील नवाकदल परिसरात भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK