ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2025 | गुरुवार


1) मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचाराच्या खटल्यात दोषी, करुणा शर्माला महिन्याला द्यावी लागणार  2 लाख रुपयांची पोटगी https://tinyurl.com/36enev6t करुणा शर्मांकडून दरमहा 15 लाखांच्या पोटगीची मागणी, अधिक रक्कम मिळावी म्हणून उच्च न्यायालयात जाणार https://tinyurl.com/c5c7d3nf 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत, माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत, धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर करुणा शर्मांच्या मुलाची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4j5vx3df धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी असल्याचं न्यायालयाने कुठेही म्हटलं नाही, मुंडेंच्या वकील सायली सावंत यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2znj59h2


2) मंत्री धनजंय मुंडेंचा 2 तासांत राजीनामा घ्या, तिसरा तासही लागू नये; कोर्टाच्या निर्णयानंतर अंजली दमानिया आक्रमक https://tinyurl.com/43ncfujt कापूस साठवणुकीच्या पिशव्या खरेदीत धनंजय मुंडेसह श्रीकृष्ण पवारांनी 41 कोटी 59 लाखांचा भ्रष्टाचार केला, नाना पटोलेंचा आरोप https://tinyurl.com/mpwtnm64


3) नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर भाष्य करणाऱ्या बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार https://tinyurl.com/2s3jtx56 संतोष देशमुख हत्या प्रकरण! उज्वल निकमांच्या नियुक्तीसंदर्भात धनंजय देशमुख घेणार आमदार सुरेश धसांची भेट, चर्चेनंतर निर्णय होण्याची शक्यता https://tinyurl.com/38uzfdny


4) मी उशिरा फोन करतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो, आपण एकदा बसून बोलूया, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छगन भुजबळांना फोन https://tinyurl.com/3s5kdbxk ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही, त्यांनी कुस्तीवर बोलू नये, अजित दादांशी निगडित आहात म्हणून थोडा मान-सन्मान राखतो, आमदार संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर पलटवार https://tinyurl.com/3yjnkx5n


5) बदलापूर लैंगिक प्रकरण! अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही? हायकोर्टाचा सवाल https://tinyurl.com/2s4ahku3 आम्हाला ही केस लढवायची नाही, अक्षय शिंदेच्या आई-वडिलांची खळबळजनक भूमिका https://tinyurl.com/ys24eb8a


6) अवैधरित्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना वेश बदलून पोलिसांनी घेतलं ताब्यात, पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश केल्याचा संशय https://tinyurl.com/4mv6knj8
मृत शिक्षकाला दिले परीक्षेचे काम, संबंधित शाळेने माहिती देऊन सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा, गोंदिया जिल्ह्यातील प्रकार https://tinyurl.com/28pxwyte नाशिकमध्ये तडीपार गुंडांचा हैदोस, तरुणावर कोयत्याने केले वार, मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार https://tinyurl.com/53st3277


7) ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी परभणी आणि वाशिम जिल्हाप्रमुखांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश https://tinyurl.com/ydv6xs97 तुमचे चरण्याचे धंदे बंद करा, राज्य सरकारच्या तिजोरीच्या खडखडाटावरून अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/yzmm48ah


8) राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, विद्यार्थ्यांअभावी शाळांना टाळं ठोकण्याची वेळ, हजारो शाळा एक आकडी पटसंख्येवर https://tinyurl.com/mt6t48wh मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार, शासन निर्णय जारी https://tinyurl.com/ytf942mr


9) देशात नॉन-व्हेजवर बंदी घालायला पाहिजे, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mrjbbn6t स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरण! 10 ते 12 जणांविरोधात सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल https://tinyurl.com/2wmfvfkz


10) क्रीडा विश्वात शोककळा! लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/mrk9przd पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे भारतासमोर 249 धावांचं लक्ष्य, कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेलची अर्धशतके, भारताकडून हर्षित आणि जडेजाने घेतल्या प्रत्येकी 3 विकेट https://tinyurl.com/mr36vbet