Dhananjay Deshmukh :मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सगळ्या आरोपींचे पुन्हा रिमांड घ्या अशी मागणी धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh)वारंवार करत आहेत .यासाठी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम (Ujwal Nikam) यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश धस यांनी केल्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची भेट घेणार आहेत .या प्रकरणात आता वकिलांची आवश्यकता आहे . रिमांड संदर्भात कुठपर्यंत प्रक्रिया झाली आहे यासंदर्भातही चर्चा करणार असल्याचं करण्याचं धनंजय देशमुख म्हणाले .
धनंजय देशमुख आमदार सुरेश धस यांचे भेट घेण्यासाठी आष्टीकडे रवाना झाले आहेत .उज्वल निकम यांच्या नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याची शक्यता आहे .
उज्वल निकमांच्या नियुक्तीवरून सुरेश धसांची भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेच्या मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी प्रशासनावर केला होता .या मोबाईल मध्ये अनेक व्हिडिओ कॉल क्लिप्स ,ऑडिओ क्लिप तसेच फोन कॉल रेकॉर्ड आहेत .या फोनवरून अनेक वरिष्ठांना फोन लावले गेलेत .या प्रकरणातून कसं सुटायचं हे ठरवण्यात आल्याचा गप्पेस्फोटही धनंजय देशमुख यांनी केला होता .या मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्यावे आणि मोबाईल शोधून काढावा अशी मागणी ही त्यांनी केली होती .या संदर्भातच आज ते सुरेश धस यांची भेट घेणार आहेत .यासाठी तर आष्टीला गेले असून या संपूर्ण प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती बाबत कुठवर हालचाली सुरू आहेत याची चाचपणी करण्यासाठीची ही भेट असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितले .
काही दिवसांपूर्वी जेष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सरकारी वकील म्हणून निकम यांच्या नावाची घोषणेची दाट शक्यता आहे. याबाबत कुठपर्यंत प्रक्रीया झाली? यावरून धनंजय देशमुख आष्टीला सुरेश धसांची भेट घेणार आहेत. याविषयावर या धस आणि देशमुख यांच्यात काय बोलणं होतं हे महत्वाचं ठरणार आहे. चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा:
करुणा शर्मा कुणाची तरी बहीण, लेक, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे; मनोज जरांगे स्पष्टच बोलले