एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2020 | गुरुवार


1. अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन, मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार, बॉलिवूडसह देशभरात हळहळ

2. इतर राज्यात अडकलेले लोक आपल्या राज्यात परतू शकणार, समन्वयासाठी सरकारकडून 3 अधिकाऱ्यांची नेमणूक; यात्रेकरू,पर्यटकांनाही मोठा दिलासा

3. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 1 हजार 718नवे रुग्ण, देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार 50 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

4. राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 73 बसेस पोहचल्या; विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू 

5. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबतचा निर्णय 2 ते 3 दिवसात घेणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

6. पुढच्या सहा महिन्यांसाठी शेती कर्जावरील व्याज केंद्रानं भरावं, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर शेती, उद्योगांसाठी मोठ्या निर्णयाची गरज असल्याचा शरद पवारांचा सल्ला 

7. कुठल्याही रुग्णाला तपासणीशिवाय पाठवू नका, राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयांना सूचना, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश 

8. मालेगावात एका रात्रीत 82 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 253 वर ; आरोग्यमंत्र्यांची मिशन मालेगावची घोषणा 

9. कोरोनाच्या संकटात गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटींची गरज, राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचं मत

10. कोरोना व्हायरसच्या टेस्टचा 45 मिनिटांत रिझल्ट समजणार; संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध 

BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर ! यांचा ब्लॉग

BLOG | पोलीस हवालदार, शिपाई अन् नाईक यांच्या व्यथा..., रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग

BLOG | एग्झिट चुकलीच इरफान!, सौमित्र पोटे यांचा ब्लॉग