ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2024 | गुरुवार  


1. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, MPSC ने संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलली; तरीही विद्यार्थी आंदोलनावर ठाम म्हणाले, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश करावा https://tinyurl.com/22e9svrs  BMC भरतीची "पहिल्या प्रयत्नात पदवी" ही अन्यायकारक अट मागे घ्या, अन्यथा दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांचे नुकसान, आदित्य ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/4a6e5vxe  


2. लोक रस्त्यावर उतरल्यावर जागे झालात का? बदलापूर अत्याचार प्रकरणात हायकोर्टाने सरकारला झाडलं, पोलिसांनाही झाप झाप झापलं https://tinyurl.com/5n773kbe  बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, सुमोटो याचिका दाखल, तातडीच्या सुनावणीची वेळ ठरली, उद्या होणार सुनावणी https://tinyurl.com/46s8caz 


3. माझ्या मुलाला फसवलं जात आहे, पुन्हा मेडिकल चाचणी करा, बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट,आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा सनसनाटी दावा https://tinyurl.com/mh9jaysv  अक्षयची तीन लग्न झालीत, ही गोष्ट खोटी आहे; अक्षय ज्या बाथरुमची साफसफाई करायचा तिकडेही सीसीटीव्ही होता; एबीपी माझाच्या प्रश्नावर आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांची प्रतिक्रिया, मात्र शेजारी म्हणतात अक्षयची तीन लग्न झाली https://tinyurl.com/mt39aey7 


4. बदलापूरच्या घटनेत तुम्हाला राजकारण दिसतंय तर तुम्ही विकृतच, उद्धव ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका; 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक  https://tinyurl.com/ycy8yfzm  दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! राष्ट्रवादीची नेते अनिल देशमुख यांचा सवाल https://tinyurl.com/yjpyzjzz  बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल https://tinyurl.com/4btc3ujt 


5. शाळकरी लेकी भयग्रस्त; विदर्भ दौऱ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहात पोहोचले,भंडाऱ्यात मिळणाऱ्या सोयींची केली चौकशी https://tinyurl.com/58kndny4  बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/32jaj4cv 


6. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगेंच्या भेटीला, अंतरवाली सराटीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, सदिच्छा भेट असल्याची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2rvpbd84  महाराष्ट्रात 700 ते 800 इच्छुक उमेदवार, सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातून , मनोज जरांगे पाटील यांचा दावा https://tinyurl.com/5aww7fys  राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी https://tinyurl.com/dex2kh3w 


7. IAS इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती https://tinyurl.com/44ybapf6 


8. मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं वक्तव्य शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरुच https://tinyurl.com/y35kepfy  हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू, काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/y7tzuxdc 


9. विधानसभा निवडणुकांपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, ठाकरे गटाची भूमिका https://tinyurl.com/3zhtnxmk 


10. आयसीसीच्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा, कसोटी क्रिकेटमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू जाडेजाही प्रथम क्रमांकावर https://tinyurl.com/bdezxb6a  टीम इंडियाचा 'गुरु' आता अफगाणिस्तान संघाला प्रशिक्षण देणार; रामकृष्णन श्रीधर  यांच्यावर अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाची जबाबदारी https://tinyurl.com/4upm5u3d 


एबीपी माझा स्पेशल 


मन सुन्न झालंय... आठवडाभरातच 12 घटना, शालेय मुलींवरील अत्याचाराने हादरला 'पुरोगामी महाराष्ट्र' https://tinyurl.com/3r7dd9sd  


एकेकाळी कपडे भांडी धुतली, आज मात्र अब्जावधींचा मालक, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योगपतीची संघर्षगाथा https://tinyurl.com/4rwxyzks  


अमूलच्या शिरपेचात मानाचा तुरा, जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड म्हणून मान्यता, नेमकं किती आहे ब्रँड व्हॅल्यू? https://tinyurl.com/4uv7mh6c 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w