Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन (law and order) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केलीय. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. 


राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या घटनावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत विरोधक सरकारवर प्रहार करत आहेत. अशातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. 


संविधान बचामुळं सर्वच दलित समाज हा महाविकास आघाडीकडून


काँग्रेससाठी मराठवाड्यात चित्र फार चांगलं आहे. संविधान बचामुळं सर्वच दलित समाज हा महाविकास आघाडीकडून आहे. चारशे पारची घोषणा तुम्हीच केली सर्व घोषणा तुम्हीच करत आहात. त्यामुळं लोकांच्या नजरेत त्या गोष्टी येतात. चारशे पारची घोषणा म्हणजे संविधान बदलण्याच्या भूमिकेत येणे असा त्याचा अर्थ होतो आणि ते आम्ही खपवून घेणार नाही असे चव्हाण म्हणाले. महायुतीला देशातील आरक्षण हे रद्द करायचा आहे. मोहन भागवत मागे एकदा बोलले होते की आरक्षण आता भरपूर झाले आणि बस झाले आहे. त्याच दिशेने तुम्ही पावलं टाकत आहात अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर केली. 


महाराष्ट्र हे दरडोही उत्पन्नाच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर


आज महाराष्ट्र हे दरडोही उत्पन्नाच्या बाबतीत 11 व्या क्रमांकावर गेला आहे. गुजरात आपल्यापुढे आहे. तेलंगाना पुढे आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अॅप्पल उत्पादन करणारे जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते इतर राज्यांमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्रात एकही कंपनी नाही याबाबत आम्हाला चिंता असल्याचे चव्हाण म्हणाले. केंद्र सरकारच्या बँकिंग सेवेच्या परीक्षा सुरू आहेत. काही अडचणी येऊ शकतात. अनेक अडचणी येत आहेत. दोन्ही परीक्षा क्लॅश होत आहेत हे माहीत होते. परीक्षा लांबणीवर न्यायला हवी होती. मात्र त्यांनी परीक्षा लांबवला नाही. आता आंदोलन सुरू आहे. mpsc ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.


महत्वाच्या बातम्या :


मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ती आमची प्राथमिकताच नाही!