ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2025 | बुधवार
1. गद्दारांचा सन्मान केलातच कसा? शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या दिल्लीतील सत्कारावर संजय राऊतांचा सवाल, साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचा घणाघात https://tinyurl.com/mr2kfaj7 पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता, शिंदेच्या सत्कारावर उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी, राऊतांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असल्याचंही स्पष्ट https://tinyurl.com/3sdc7knc
2. एकनाथ शिंदे हे महादजी शिंदे यांच्या साताऱ्याच्या भूमीतून आले, त्यांनी काश्मीर आणि पंजाबमध्येही महाराष्ट्र सदन बांधलं, दिल्लीतील कार्यक्रमाचे आयोजक संजय नहार यांनी स्पष्ट केली पुरस्कारामागची भूमिका https://tinyurl.com/3ku4j9er राष्ट्रवादीत फूट पाडणाऱ्या अजितदादांना उद्धव ठाकरे भेटले होते, अमोल कोल्हेंकडून संजय राऊतांना आठवण https://tinyurl.com/ywzn66a6
3. राजापूरचे माजी आमदार राजन साळवींचा अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र, उपनेतेपदाचा राजीनामा, उद्या शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश https://tinyurl.com/yrdpn2d3
4. परळीतील मतदान केंद्रावर राडा करणाऱ्या धनंजय मुंडे समर्थकावर कारवाई, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी कैलास फडवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/3rassfz9 धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या दबावामुळेच या आधी गुन्हा दाखल करुन घेतना नाही, माधव जाधवांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2b9bn85k
5. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची तक्रार अजूनही मागे घेण्यात आली नाही, आम्ही घटनाक्रम तपासतोय, पुण पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती https://tinyurl.com/4s8xba64 अभिनेता राहुल सोलापूकरांच्या दोन्ही व्हिडीओत आतापर्यंत काही आक्षेपार्ह आढळलं नाही, अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2a8k8hvr
6. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर पळून जाणाऱ्या कराड गँगला पोलिसांनीच टीप दिली, धनंजय देशमुखांचा मोठा आरोप https://tinyurl.com/4t5ph6pj अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतलं, परळीतील बोगस विकासकामांबाबत कारवाईला वेग येण्याची शक्यता https://tinyurl.com/mryn6u6h
7. नांदेडमध्ये गुरुशिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना, गुंगीचं औषध देऊन शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गर्भपातही केला https://tinyurl.com/bdf26jfj सोलापुरात नोकरीचे आमिष दाखवून उद्योजकाकडून महिलेवर अत्याचार, दोघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/4cj275uk
8. महिलांची छेडछाड काढाल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू, पुणे पोलिसांचा गुंडांना दम https://tinyurl.com/yrrecm5j
9. इंग्रजीचा पेपर बघताच टेन्शन वाढलं, पुण्यातील विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी टाकली https://tinyurl.com/37rnvzj2 परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, परभणीत तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/y5unvttc
10. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या 356 धावा, शुभमन गिलचे शतक तर कोहली-अय्यरचे अर्धशतक https://tinyurl.com/9thdrhf2 जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, यशस्वी जैस्वाललाही वगळले, BCCI ची घोषणा, पाहा टीम इंडियाचा संपूर्ण संघ https://tinyurl.com/ycxm2u65
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w