1. लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 महिन्यांत सोन्याचे दर पहिल्यांदाच 45 हजारांच्या खाली, ग्राहकांसाठी मोठा दिलासा


2. बंदी घातलेल्या बीएस फोर गाड्या विकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 14 कोटींच्या 151 गाड्यांची विक्री, चेसी नंबरसह कागदपत्र आणि नंबर प्लेटही बनावट


3. बॉलिवूडच्या बड्या स्टार्सशी निगडीत क्वान कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी, काल रात्रभर कागदपत्रांची शोधाशोध, तापसी-अनुरागवरच्या कारवाईवरुन राजकारण


4. जळगावच्या आशादीप वसतीगृहातील गैरव्यवहार प्रकरणी संध्याकाळपर्यंत अहवाल सादर होण्याची शक्यता, अद्याप कोणताही व्हिडीओ हाती लागला नाही, पोलिसांची प्रतिक्रिया


5. पुरवणी मागण्यांवरुन सभागृहाचा राजकीय आखाडा होण्याची शक्यता, तर काल मुख्यमंत्री ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जोरदार वाग्युद्ध, बाळासाहेबांच्या खोलीतल्या चर्चेवरुन शाहांना टोला



6.खर्डी-उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळाशेजारी लागलेली आग रात्री उशिरा नियंत्रणात, आग लागली की लावली याचा छडा लावण्याचं आव्हान


7. 94व्या साहित्य संमेलनाबाबत पुढील 3 दिवसांत योग्य तो निर्णय होईल, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांची 'एबीपी माझा'ला माहिती


8. कोल्हापुरात कोर्टात सादर करताना पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात फरशी घालून पळ, आरोपींना पुन्हा बेड्या


9. तामिळनाडू निवडणुकीपूर्वी व्ही.के. शशिकला यांचा राजकारणातून संन्यास, द्रमुक पक्ष सत्तेत येऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन


10. कसोटी मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज, आजपासून अहमदाबादमधल्या मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंडमधला चौथा कसोटी सामना