1. मुंबईतल्या खासगी रुग्णालयातही मिळणार कोरोनाची लस, केंद्राचे निकष पूर्ण करणाऱ्या 29 खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी, गर्दी टाळण्यासाठी निर्णय
2. कोरोना लसीकरणासाठी अॅपवर नव्हे पोर्टलवर नोंदणी करावी लागणार, तर केंद्रावर जाऊनही नोंदणीचा पर्याय, लसीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी गर्दी
3. चीननं सायबर हल्ला केल्याचा अहवाल धादांत खोटा, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, तर चीनच्या दुतावासनही सायबर हल्ल्याचा आरोप फेटाळला
4. आणीबाणी घोषित करणं ही इंदिरा गांधींची चूक होती, काँग्रेस नेते राहुल गांधींचं मोठं वक्तव्य, पक्षानं कधीही फायदा करुन घेतला नसल्याचंही स्पष्ट
5. अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी पोस्टल बॅलेटच्या आधारे मतदान करु शकतात, केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती
6. मेट्रो कारशेडच्या वादावर 12 मार्चपासून अंतिम सुनावणीला सुरुवात; जागा मालकाला भरपाई देऊ, MMRDA ची हायकोर्टात माहिती
7. 'गोकुळ'च्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा, पुन्हा हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार
8. पूजा चव्हाणच्या कुटुंबाकडून आपल्या हत्येचा कट, चुलत आजी शांताबाई राठोड यांचा आरोप, पूजाच्या पालकांनी पाच कोटी घेतल्याचाही घणाघात
9. गोरेगावमध्ये अजय देवगणची गाडी एकानं रोखली, शेतकरी आंदोलनावर ट्वीट न केल्याबाबत विचारला जाब, पोलिसांकडून आरोपीला अटक
10. कोरोना काळात 'अब्जाधीश क्लब'मध्ये 40 भारतीयांचा समावेश, मुकेश अंबानी जागतिक श्रीमंतांच्या यादीत आठव्या स्थानावर, हुरुन इंडियाचा अहवाल