1. केंद्राच्या धर्तीवर राज्यात सात नवी खाती बनवण्याचा प्रस्ताव, महाविकासआघाडीतल्या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारचा उतारा

    2. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हा परिषदांसाठी आज मतदान, महाविकास आघाडीच्या समीकरणांमुळे दवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजनांची प्रतिष्ठा पणाला

    3. चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात अखेर दिलजमाई, मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरेंकडून दोघांनाही समज, वाद मिटल्याचं खैरे-सत्तारांकडून स्पष्ट

    4. जेएनयूतला हल्ला पूर्वनियोजित कट, कोडवर्डच्या माध्यमातून आखली रणनीती, दिल्ली पोलिसांकडून 50 जणांविरोधात गुन्हा

    5. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची आझाद मैदानात रवानगी, तर आदोलकांना ताब्य़ात घेतल नसल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण






  1. जेएनयू हल्ल्याच्या निषेधासाठी बॉलिवूड कलाकार रस्त्यावर, वांद्र्यातील कार्टर रोडवरील आंदोलनात अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, तापसी पन्नू यांचा सहभाग

  2. 7. भविष्यात मनसे भाजपसोबत जाऊ शकते, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बाळा नांदगावकरांचे संकेत, मनसेच्या भूमिकेमुळे राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता

  3. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, 8 फेब्रुवारीला मतदान तर 11 फेब्रुवारीला निकाल, अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा पणाला

  4. 9. अभिनेता अक्षय कुमार निरमा पावडरच्या जाहीरातीमुळे वादात, जाहिरातीत अक्षय आणि इतर कलाकार मावळ्याच्या वेशात, शिवप्रेमींचा संताप, अक्षयच्या माफीची मागणी

  5. 10. यंदा मिळणार महाराष्ट्राला नवा महाराष्ट्र केसरी, लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी लढणार