देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आजपासून सुरु होणार; सरकारच्या नियमावलीची अंमलबजावणी करावी लागणार, कामगारांअभावी हॉटेल्स 30 टक्के क्षमतेनेच उघडण्याची शक्यता
2. डेबेवाल्यांना लोकल प्रवासाला परवानगी, क्यूआर कोड नसल्यानं अडचणी येण्याची शक्यता, तर गुरुवारपासून अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे, लोणावळा लोकल सेवा
3. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मराठ्यांना आरक्षण नकोच, खासदार संभाजी राजेंची न्यायिक परिषदेत ठाम भूमिका, सरकारवर दबाव टाकण्याचंही आवाहन
4. गेल्या सहा वर्षात काँग्रेसकडून फक्त भाजपच्या धोरणांना विरोध, लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्यामुळे राहुल गांधी धडपडून पडलेत; रावसाहेब दानवे यांच्याकडून राहुल गांधींची खिल्ली
उडवणारं वक्तव्य
5. सुशांत प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी करणारे माफी मागणार का? सामनातून भाजपला सवाल, नाव न घेता कंगनावरही निशाणा
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 5 ऑक्टोबर 2020 | सोमवार | ABP Majha
6. मुंबई महापालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समीतीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणुका; काँग्रेस आणि शिवसेनेची पडद्यामागे हातमिळवणी झाल्याची चर्चा
7. लॉकडाऊन आणि महागाईची मुंबईच्या वडापावलाही झळ! सर्व जिन्नस महागल्यानं वडापावच्या दरात दोन ते पाच रूपयांनी वाढ
8. मशीद बंदरजवळील कटलरी मार्केटमधील आग नियंत्रणात, तीन इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी; 13 जणांची सुखरूप सुटका, तर आग विझवताना दोन जवान जखमी
9. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत ट्रम्प यांची धक्कादायक चाल; कोरोना बाधित असतानाही ट्रम्प रुग्णालयातून प्रचारात
10. आयपीएल 2020 मध्ये काल चेन्नईकडून पंजाबचा 10 विकेट्सनी धुव्वा, शेन वॉटसन-फाफ ड्यू प्लेसिसची अभेद्य सलामी; आज बंगलोर विरूद्ध दिल्ली सामना रंगणार