नवी दिल्ली : देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १४.९ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभाग (एनसीआरबी) ने ही माहिती जाहीर केली आहे.


एनसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात 891 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानमध्ये (424), तामिळनाडू (418), कर्नाटक (379), ओडिसा (353) गुन्ह्याची नोंद झाली आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या राज्यांमध्ये सिक्कीम (०), नागालॅंड (1),मिझोरम (2), मेघालय (2), मणिपूर (6), गोवा (9) राज्यांचा समावेश आहे.


इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांची संख्या दुप्पट आहे. भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यात अनेक नागरिक पुढे येत असल्याने भ्रष्टाचाराचे गुन्हे अधिक असण्यास कारणीभूत ठरले आहे.


राज्यात 866 प्रकरणात सापळे रचून कारवाई करण्यात आली आहे. या पैकी 370 गुन्ह्यांमध्ये खटला पूर्ण झाला असून त्यातील 55 गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा झाली आहे. तर 294 गुन्ह्यांमध्ये आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 21 गुन्ह्यांमध्ये पुराव्या अभावी गुन्हे मागे घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे.


भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणबाबत महाराष्ट्र शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.


संबंधित बातम्या :



वस्तू आणि साहित्यांच्या किमतीपेक्षा जास्त भाडे अदा, कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप