- दोन लाखांच्या पुढची कर्जमुक्ती करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आश्वासन
- वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळलं, तरुणीची मृत्यूशी झुंज, अटकेतील आरोपीला फाशी देण्याची मागणी, तर हिंगणघाटमध्ये आज सर्वपक्षीय बंद
- वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 95 लाचखोर जाळ्यात, चिरीमिरी घेण्यात पोलीसच अव्वल, तर सर्वात जास्त पुण्यातल्या लाचखोरांवर कारवाई
- मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार, तिजोरीच्या गळतीमुळे विकासकामांना ब्रेक लागण्याची शक्यता, मालमत्ता कर थकल्यानं पालिकेचं मोठं नुकसान
- भाजपला शह देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतही महाविकासआघाडी एकत्र, आज पहिल्या मेळाव्याचं आयोजन, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, अशोक चव्हाण उपस्थित राहणार
+
- 'मुंबई बाग' आंदोलनावरुन आयोजक आणि आंदोलकांमध्ये ताळमेळ नाही, गुरुवारी आंदोलन मागे घेण्याची आयोजकांची माहिती, महिला मात्र आंदोलनावर ठाम
- शरजील इमामच्या समर्थनाथ घोषणा दिल्याने 51 जणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल, मुंबईत आझाद मैदान पोलिसांची कारवाई
- सीएएविरोधातली आंदोलनं हे राजकीय कटकारस्थान, शाहीन बागप्रकरणी नरेंद्र मोदींचं वक्तव्य, दिल्लीतल्या रॅलीत काँग्रेस, केजरीवालांवर घणाघात
- मुलाला मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं सोनिया गांधींना पत्र, पक्षाशी एकनिष्ठ असूनही थोपटे कुटुंबाला न्याय मिळत नसल्याची खंत पत्रातून व्यक्त
- अंडर नाईंटीन विश्वचषकात आज भारत-पाकिस्तान यांचा महामुकाबला, भारताला सातव्यांदा अंतिम फेरी गाठण्याची संधी