देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. संयुक्त किसान मोर्चा देशभरात 6 फेब्रुवारीला चक्काजाम करणार, पत्रकार परिषदेत माहिती, टिकरी सीमेवर पोलिसांकडून खबरदारी म्हणून खिळ्यांची वेढाबंदी

2. वाढीव वीजदरवाढीविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा, 5 फेब्रुवारीला राज्यभर महावितरणविरोधात आंदोलन करणार

3.एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करणं ही मुंगेरीलालची कारवाई, गुलाबराव पाटलांचं शिर्डी साई संस्थानावर टीकास्त्र, मंत्रिमंडळ बैठकीत मुद्दा उपस्थित करणार

4. निवडणुकांच्या तोंडावर कल्याण-डोबिंवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्ष राजेश कदमांसह 11 पदाधिकारी शिवसेनेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

5. निवडणूक जिंकण्यासाठी ‘बजेट’चं हत्यार वापरणे कितपत योग्य? सामनाच्या अग्रलेखातून सवाल

6. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस आणि कंटेनरचा अपघात, 15 जण जखमी, जखमींवर कासा रुग्णालयात उपचार सुरु

7. कंगना रनौतला मानहानीच्या केसमध्ये समन्स, जावेद अख्तर यांचा अब्रुनुकसानीचा दावा, 1 मार्चला अंधेरी दंडाधिकारी कोर्टात पुढील सुनावणी

8. बंगळुरु येथील गोल्ड रिफायनरीतून 12 किलो सोन्याची चोरी, आरोपी अटकेत

9. ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 18 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 406 रुग्णांचा मृत्यू

10.भारत वि. इंग्लंडच्या भारतात होणाऱ्या मालिकेत प्रेक्षकांना मैदानात बसून सामना पाहता येणार, तिकीट विक्रीबाबत लवकरच माहिती मिळणार