स्मार्ट बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा


मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र, येत्या दोन दिवसात लोकल सुरू होण्याची चिन्हं

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता


राष्ट्रीय आरोग्य मिशनमधील नियुक्त्यांच्या नावाखाली 400 कोटींचा गैरव्यवहार; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

महापरीक्षा पोर्टलचा सावळागोंधळ, कंपनीच्या कारभारावर गंभीर आक्षेप, सरकारला 17 कोटींचा भुर्दंड

कंगना वादाचा मुंबई महापालिकेला फटका, न्यायालयीन लढाईसाठी 82 लाखांचा खर्च


आरोग्य सेतू अॅप कुणी बनवलं? केंद्रीय माहिती आयोगाच्या नोटिशीनंतर सरकारचं स्पष्टीकरण

ट्विटर डाऊन झाल्याने नेटकरी हैराण, तासाभरानंतर सुरुळीत झाले ट्विटर, कारण अस्पष्ट

बिग बॉसमध्ये जान सानूकडून मराठी भाषेचा अवमान, शिवसेना, मनसेच्या विरोधानंतर कलर्स वाहिनीनं मागितली माफी

रियाच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी थेट गुन्हा कसा दाखल केला? सीबीआयचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

मुंबईचा बंगलोरवर 5 विकेट्सनी विजय, मुंबईची प्ले-ऑफमध्ये धडक, सूर्यकुमार यादवची विजयी खेळी, आज चेन्नई-कोलकाता भिडणार