- महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार, शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, आज दुपारी 1 वाजता मंत्रालयात स्वीकारणार पदभार
- शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाई देसाई शपथबद्ध, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, भुजबळ तर काँग्रेसकडून थोरात आणि नितीन राऊतांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 दिवसांत मोठा निर्णय, फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर
- मोदी-उद्धव यांच्यातील नातं भावाचं, पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी, सामनातून आवाहन, तर पंतप्रधान देशाचे असतात, एका पक्षाचे नाही म्हणत सूचक टोला
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला शरद पवार, राज ठाकरे, फडणवीसांसह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचीही उपस्थिती, उद्योजक, शेतकरी, वारकऱ्यांचीही हजेरी
- मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, 4 जण ठार 2 गंभीर, टँकरला मागून स्विफ्ट कारची धडक
- उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई, जळगाव, बारामती, यवतमाळ, नाशकात दोन्ही काँग्रेसकडून आनंद साजरा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार | ABP Majha
8.पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर, शपथविधीनंतर रात्रीच कॅबिनेटची पहिली बैठक
- विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, कन्नड संघटनांकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगडच्या आमदाराचा फोटो जाळून निषेध
- पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता, मनमाडमध्ये बीपीसीएल कर्मचाऱ्यांचं गेट बंद आंदोलन