देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


स्मार्ट बुलेटिन | 28 मार्च 2020 | शनिवार | एबीपी माझा

  1. उपमुख्यमंत्र्यांच्या एकाच दिवशी संचारबंदीसाठी तैनात दहा पोलिसांना मारहाण, क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला स्टंपने मारहाण केल्याची खळबळजनक घटना


 

  1. पालघरमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर परतताना मृत्यू, वाहन न मिळाल्याने मुलांनी वडिलांचा मृतदेह दुचाकरीवरून नेला


 

  1. काहीही झालं तरी कोरोनाला हरवणार, भिवंडीतील आदिवासी कुटुंब लॉकडाऊनमुळे पाच दिवस उपाशी, रोजहार नसल्याने उपासमारीची वेळ


 

  1. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फुटाची जवळीक केल्यास थेट जेलची शिक्षा, सिंगापूरमध्ये महामारी वाढत असल्याने नवा कडक नियम लागू


 

  1. 18 जानेवारीनंतर परदेशातून आलेल्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवा, केंद्र सरकारचे आदेश




  1. कोल्हापुरात कोरोनाबाधित रूग्णांसाठी खुलं केलं थ्री स्टार हॉटेल, होम कॉरंटाईनची सुविधा नसणाऱ्यांसाठी स्वतःचं थ्री स्टार हॉटेल खुलं करत तरूण उद्योजकाचा पुढाकार


 

  1. कोरोनामुळे प्रवासाची साधनं बंद असल्याने लोकांचा पायी प्रवास सुरू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत पायी जाणाऱ्या पाच जणांचा भीषण अपघात


 

  1. कोरोना व्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या, तीन दिवसांपूर्वी पुलावरून पंचगंगा नदीत उडी


 

  1. मुंबईत कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू; राज्यात 159 कोरोनाबाधित, तर देशभरातील मृतांची संख्या 19वर


 

  1. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कलाकारांचा मदतीचा हात, हृतिक रोशन, कपिल शर्मा, प्रभास यांची विविध तऱ्हेने सरकार, महापालिकेला मदत, सौरव गांगुलीची गोरगरिबांना धान्याची मदत