1. 40 टक्क्याहून अधिक जनता ठाकरे सरकारवर असमाधानी, एबीपी - सी व्होटरच्या सर्व्हेची आकडेवारी, मात्र आता लोकसभा निवडणूक झाल्यास राज्यात एनडीएऐवजी यूपीएला यश


2. थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात 9 हजार ग्रामपंचायतींचा ठराव, ठाकरे सरकारला मोठा धक्का, पुन्हा थेट निवडणूक घेण्याची मागणी


3. ठाकरे सरकारच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेचा शुभारंभ, मुंबईसह राज्यभरात केंद्रांचं उद्घाटन, अवघ्या 10 रुपयांत गरजूंना पोटभर जेवण


4. मराठवाड्याच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचं औरंगाबादेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, भाजपचे दिग्गज नेते उपोषणात सहभागी होणार


5. पवारांना ईडीची नोटीस गेली, तेव्हाच बदलाची ठिणगी पेटली, ठाण्यातल्या शरद पवारांच्या नागरी सत्कार सोहळ्यात संजय राऊतांचं मोठं वक्तव्य


व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 जानेवारी 2020 | सोमवार | ABP Majha



6.मुंबईत मध्यरात्रीतून नाईट लाईफला सुरुवात, मॉल्स, थिएटर, हॉटेल्स पहाटेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी, तर मुख्यमंत्र्यांकडून पहिल्या मुक्त पक्षी विहार दालनाचंही लोकार्पण


7. खासदार जलिलांविरोधात याचिका करणाऱ्याला एमआयएम कार्यकर्त्यांकडून मारहाण, तिरंगा रॅलीत राडा, झेंड्याचा अपमान केल्यानं मारहाण केल्याचा जलिलांचा दावा


8. नागपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठणारं कृत्य, सूतगिरणीत काम करणाऱ्या महिला कामगारावर पर्यवेक्षकाकडून बलात्कार


9. 'मी मुस्लीम, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं हिंदुस्तान'; सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानचा व्हिडीओ व्हायरल


10. ऑकलंडच्या दुसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीतही टीम इंडियाची बाजी, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरच्या निर्णायक भागीदारीमुळे भारताचा सात विकेट्सनी विजय