1. मुंबई सेंट्रलमधील मॉलला भीषण आग, 10 तासांपासून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरुच, 400 हून अधिक लोकांची सुटका


2. महिला प्रवाशांपाठोपाठ आता वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा, मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी कलर कोडचा पर्याय, सर्वांसाठी लोकल सुरु करण्याची चाचपणी सुरु


3. आज दुपारी 2 वाजता एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर खडसेंचा निशाणा, नितीन गडकरींशी केलेली चर्चाही निष्फळ झाल्याचं वक्तव्य


4. बिहारच्या राजकीय आखाड्यात आज एकाच दिवशी पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आमने-सामने, जाहीर सभांनी निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात


5. कोरोना लसींसाठी 51 हजार कोटींची तरतूद, मोदींचा निर्णय, तर सत्ता आल्यास बिहारमध्ये लसींचा मोफत डोस, भाजपचा जाहीरनामा; मध्यप्रदेशात गरिबांना तर तमिळनाडूत सर्वांना मोफत लसीची घोषणा


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 ऑक्टोबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. सणासुदीच्या तोंडावर सर्वच भाजीपाल्यांचे दर 120 ते 150 रुपयांच्या घरात, दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा नाहीच, तर ग्राहकांनाही मोठा फटका


7. महाराष्ट्रात शेकडो कोटींचा जीएसटी घोटाळा उघडकीस; नागपूर, औरंगाबाद, नाशिकमधल्या 22 कंपन्यांकडून सरकारला चुना, उस्मानाबादमधून एकाला अटक


8. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी, खासदार संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया


9. कोरोना काळातही तिरुपतीहून अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा कायम, पारंपारिक पद्धतीनं सोहळा संपन्न, तर नांदेडच्या रेणुका मातेची कात्ययानी रुपात पूजा


10. सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थानचा आठ विकेट्सनी पराभव; हैदराबादचं स्पर्धेतलं आव्हान कायम, आज आयपीएलच्या मैदानात मुंबई विरुद्ध चेन्नई सामने-सामने