1. आज मनसेच्या अधिवेशनात होणाऱ्या राजगर्जनेकडे महाराष्ट्राचं लक्ष, अमित ठाकरेंच्या लाँचिंगची उत्सुकता

2. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94वी जयंती, बीकेसीवर शिवसेनेकडून जल्लोष सोहळ्याचं आयोजन

3. भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा चंद्रकांत पाटलांना संधी मिळणार, कोअर कमिटी बैठकीत निर्णय, बैठकीला पंकजा मुंडेंचीही उपस्थिती, नाराज नसल्याचा पंकजांचा दावा

4. आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील नाईट लाईफला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील; बार, पब रात्रभर सुरु राहणार नसल्याचं स्पष्ट, निर्णयावर भाजपची टीका

5. फडणवीस सरकारनं घेतलेले दोन मोठे निर्णय रद्द, एपीएमसी निवडणुकांत शेतकऱ्यांचा मतदानाचा हक्क हिरावला, तर थेट जनतेतून सरपंच निवड पद्धत रद्द

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 23 जानेवारी 2020 | गुरूवार | ABP Majha



6. महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होताच ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही निमंत्रण देणार, संजय राऊत यांची माहिती

7. पोलीस शिपायांच्या 8 हजार पदासाठी तब्बल 12 लाख अर्ज, बेरोजगारी अधोरेखित करणारी आकडेवारी, गोंधळ टाळण्यासाठी ऑफलाईन परीक्षेचा विचार

8.मुंबईच्या सरफराज खानचं रणजी करंडकात ऐतिहासिक त्रिशतक, यूपीवर निर्णायक आघाडी, तर महाराष्ट्राचा आसामवर सनसनाटी विजय

9. अजय देवगणच्या 'तान्हाजी' चित्रपटावरून नवा वाद; चित्रपटात जन्मस्थळाचा उल्लेख नसल्याने तानाजी मालुसरे यांचे गावकरी नाराज, तर बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची घोडदौड सुरुच, महाराष्ट्रात चित्रपट करमुक्त

10. भारताच्या गगनयान मोहिमेतील 'व्योममित्रा’ ही महिला रोबो करणार अवकाश सफर, मानवाआधी इस्रो महिला रोबोवर चाचण्या घेणार