स्मार्ट बुलेटिन | 22 डिसेंबर 2019 | रविवार
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा, सप्टेंबर 2019 पर्यंतचं 2 लाखाचं कर्ज माफ, सरसकट कर्जमाफीची शेतकरी नेते, विरोधकांची मागणी
2. महाराष्ट्रात विभागनिहाय मुख्यमंत्री कार्यालय, 50 ठिकाणी 10 रुपयांत शिवभोजन तर पूर्व विदर्भात पोलाद प्रकल्प, मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा
3. मंत्रिमंडळ विस्तारानंतर गृहखातं शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची दाट शक्यता, सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर अजितदादांच्या मंत्रिपदाच्या चर्चेला उधाण
4. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील 65 हजार कोटींची काम संशयाच्या भोवऱ्यात, कॅगच्या अहवालानंतर शरद पवारांकडून चौकशीची मागणी
5. एल्गार परिषदेचा सूड भावनेतून तपास, भाजप आणि पुणे पोलिसांवर शरद पवारांचे ताशेरे, दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशाने नागरिकत्त्व कायदा आणल्याचा आरोप
6. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधी आंदोलनातील हिंसाचारात उत्त्तर प्रदेशमध्ये 16 जणांचा मृत्यू, नरेंद्र मोदी आज दिल्लीच्या रॅलीत काय बोलणार याकडे नजरा
7. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशाचा कल, एबीपी न्यूज-सी वोटरने केलेल्या सर्व्हेत कायदा योग्यच असल्याचं 62 टक्के लोकांचं मत
8. मुंबईत उद्या पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज, हवामानातील बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
9. मेट्रो-3 च्या स्थानकाचा व्यावसायिक वापर, महसूल वाढीसाठी सिद्धीविनायक स्थानक परिसर भाड्याने देणार
10. भारत विरुद्ध विंडीज एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज कटकमध्ये, मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघात रंगणार अटीतटीची लढाई