स्मार्ट बुलेटिन | 22 जुलै 2021 | गुरुवार | एबीपी माझा


दोन लस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करायला हवेत, एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्वाचं वक्तव्य

मुंबईत आजही लसीकरण बंद, उद्यापासून लसीकरण सुरळीत होण्याची शक्यता

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचं धुमशान सुरुच, पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या बदलापूरमधील सोसायट्यांमध्ये आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी

मुंबईत लोकलवरुन राजकारण; मुंबईकरांसाठी रेल्वे सुरु न केल्यास भाजपचा आंदोलनाचा इशारा

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर, जवळपास एक हजार कामांची चौकशी होणार

अकरावी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी काही कालावधीसाठी बंद

सद्यस्थितीत प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार योग्य ठरेल, ICMRचं मत, राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

राज्यात बुधवारी 8159  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्ण कोरोनामुक्त

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची जंतर-मंतरवर आज 'शेतकरी संसद'