स्मार्ट बुलेटिन | 22 फेब्रुवारी 2021 | सोमवार | एबीपी माझा


1. आठ दिवसांत कोरोनाच्या प्रादुर्भावाला ब्रेक न लागल्यास लॉकडाऊन, मुख्यमंत्र्याचा इशारा, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर काही दिवस बंदी


2. लॉकडाऊनच्या इशाऱ्यानंतरही अनेकांकडून नियमांची पायमल्ली, नागपूर-पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांची गर्दी, 16 हजार हलगर्जी मुंबईकरांवर पालिकेची कारवाई

3. पुण्यात रात्री अकरानंतर विनाकारण फिरण्यावर बंदी, शाळा-कॉलेज आठवड्यासाठी बंद, नाशिकमध्येही रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी

4. अमरावती आणि अचलपूरमध्ये 7 दिवसांचा, तर अकोला, अकोट आणि मूर्तिजापूरमध्ये 1 मार्चपर्यंत लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं विदर्भात अलर्ट


5. 24 फेब्रुवारीला सकाळी 6 पर्यंत विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद, तर विदर्भाची पंढरी शेगावातलं गजानन महाराजांचं मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद

6. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सिडको लॉटरी काढण्याची शक्यता, 88 हजार घरं बांधण्याचा सिडकोचा निर्धार, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर

7. इंधन दरवाढीविरोधात युवासेनेची पेट्रोलपंपावर पोस्टरबाजी, 2015 आणि 2021 मधल्या इंधन दराची तुलना, पोस्टरबाजीसाठी आशिष शेलारांच्या मतदारसंघाची निवड

8. अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू

9. छोटी बहू फेम रुबीना दिलैक ठरली बिग बॉसच्या चौदाव्या सीझनची विजेती, राहुल वैद्य सोबत झाली कांटे की टक्कर

10. टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या, सोशल मीडियावर समीरचे लाखो चाहते